Year Ender 2024 : Google वर 2024 मध्ये सर्वाधिक सर्च कोणते भारतीय ? टॉप 10 मधील नावे पाहून बसेल धक्का

Most Searched Indian in 2024: इंटरनेटच्या जगात सर्वाधिक सर्च भारतीय कोण राहिले, त्या दहा जणांमध्ये काही धक्कादायक नावे आहेत. दहा सर्वाधिक सर्चमध्ये खेळ, राजकारण, पब्लिक फिगर यांचे मिश्रण आहे. पाहू या 2024 मध्ये सर्वाधिक सर्च राहिलेले दहा भारतीय.

Year Ender 2024 : Google वर 2024 मध्ये सर्वाधिक सर्च कोणते भारतीय ? टॉप 10 मधील नावे पाहून बसेल धक्का
Google Searche Name
Follow us
| Updated on: Dec 12, 2024 | 10:15 AM

Most Searched Indian in 2024: वर्ष 2024 संपण्यास आता काही दिवसच राहिले आहे. त्यामुळे गुगलवर वर्षभरात काय सर्वाधिक सर्च झाले? त्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. खेळ, राजकारण, ग्लॅमरच्या जगात नेटकऱ्यांना काय भावले, ते समोर येत आहे. इंटरनेटच्या जगात सर्वाधिक सर्च भारतीय कोण राहिले, त्या दहा जणांमध्ये काही धक्कादायक नावे आहेत. दहा सर्वाधिक सर्चमध्ये खेळ, राजकारण, पब्लिक फिगर यांचे मिश्रण आहे. पाहू या 2024 मध्ये सर्वाधिक सर्च राहिलेले दहा भारतीय.

कुस्तीपटू विनेश फोगाट सर्चमध्ये अव्वल

2024 मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या भारतीयांमध्ये टॉपला कुस्तीपटू विनेश फोगट राहिली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलोग्रॅम फ्रीस्टाइलमध्ये अंतिम सामन्यात 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे तिला डिस्क्वालिफाई केले होते. त्यानंतर “100 ग्रॅम” सोशल मीडियावर ट्रेंडिंग बनला. त्यानंतर विनेश फोगाट हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली. काँग्रेसकडून निवडणूक लढवून ती आमदार बनली.

दुसऱ्या क्रमांकावर नीतीश कुमार

दुसऱ्या क्रमांकावर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे नाव आले. राजकीय निर्णय आणि एनडीएसोबत जाण्याच्या निर्णयामुळे ते चर्चेचा विषय ठरले. परंतु इतर दिग्गज नेत्यांना मागे टाकून ते गूगल सर्चमध्ये अव्वल आले.

हे सुद्धा वाचा

चिराग पासवान तिसऱ्या क्रमांकावर

चित्रपटातून राजकारणात आलेले चिराग पासवान नेटकऱ्यांची तिसरी पसंत ठरले. मोदी सरकारमध्ये मंत्री बनल्यानंतर त्यांची नवीन ओळख निर्माण झाली. या राजकीय यशामुळे इंटरनेटच्या जगात त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले.

हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या आपल्या खेळासोबत खासगी जिवनामुळे चर्चेत राहिला. त्याच्या खेळापेक्षा घटस्फोटाची चर्चा अधिक झाली. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये तो सर्च झाला. तसेच T20 वर्ल्ड कपमध्ये जोरदार कामगिरी करुन त्याने लक्ष वेधले.

पवन कल्याण पाचव्या क्रमांकावर

अभिनेतापासून राजकारणात आलेले पवन कल्याण पाचव्या क्रमांकावर सर्च झालेले भारतीय ठरले. ते आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांचे हे यश गुगलवर चांगलेच सर्च झाले.

व्यक्ती कारण
1 विनेश फोगाट
पॅरिस ऑलिम्पिंकमध्ये शंभर ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे अपात्र, हरियाणा विधानसभा निवडणूक मैदानात
2 नीतीश कुमार 2024 लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश, एनडीए सोबत जाणे
3 चिराग पासवान चित्रपटातून राजकारणात येऊन मिळवलेले यश
4 हार्दिक पांड्या क्रिकेेटमधील कामगिरीसोबत घटस्फोटाची चर्चा
5 पवन कल्याण अभिनेतापासून राजकारणात, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री
6 शशांक सिंह आयपीएलमधील फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले
7 पूनम पांडे बोल्ड अंदाज आणि निर्माण केलेले अनेक वाद
8 राधिका मर्चेंट अंबानी परिवारात लग्न
9 अभिषेक शर्मा क्रिकेटमधील जोरदार कामगिरी
10 लक्ष्य सेन बॅडमिंटनमध्ये शानदार प्रदर्शन
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.