धक्कादायक, आईचा मृतदेह चित्तेवर असताना संपत्तीसाठी भांडत राहिल्या मुली, संपत्तीची वाटणी झाल्यावर अंत्यसंस्कार

| Updated on: Jan 15, 2024 | 2:58 PM

उत्तर प्रदेशात धक्कादायक घटना घडली आहे. तीन मुली आईचा मृतदेह चितेवर असताना संपत्तीसाठी भांडत राहिल्या. अखेरी स्टँप पेपरवर संपत्तीची वाटणी झाल्यावर हा वाद संपला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. या प्रकारानंतर तीन मुलींचे समाधान झाले असली तरी मानवता हारली आहे.

धक्कादायक, आईचा मृतदेह चित्तेवर असताना संपत्तीसाठी भांडत राहिल्या मुली, संपत्तीची वाटणी झाल्यावर अंत्यसंस्कार
Follow us on

मथुरा, दि.15 जानेवारी 2024 | उत्तर प्रदेशातील मथुरेत एक धक्कादायक घटना घडली आहे. मानवतेला कलंकीत ही घटना आहे. आईचा मृतदेह स्मशानात चितेवर होता. त्यावेळी मुली संपत्तीसाठी भांडत होत्या. सात-आठ तास हा वाद सुरु होता. यामुळे अंत्यसंस्कारासाठी आलेले ब्राम्ह्यण परत गेले. कंटाळून इतर लोकही निघून गेले. अखेरी स्टँप पेपरवर संपत्तीची वाटणी झाल्यावर हा वाद संपला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. या प्रकारानंतर तीन मुलींचे समाधान झाले असली तरी मानवता हारली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलेच्या मृतदेहासंदर्भात हा प्रकार घडला तिला एकही मुलगा नव्हता. तिन्ही मुली होत्या.

मोठ्या मुलीने शेत विकल्याचा आरोप

मथुरामधील मसानी स्मशानाघाटवर हा प्रकार घडला. या भागातील 85 वर्षीय महिला पुष्पा हिचा मृत्यू झाला. त्या महिलेस एकही मुलगा नव्हती. मिथिलेश, सुनीता आणि शशी या तीन मुली होत्या. त्या महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. परंतु त्या वेळी तीन मुलींमध्ये भांडण सुरु झाले. दोन मुलींनी आरोप केला की मिथिलेश हिने अडीच एकर शेत आईशी गोड बोलून महिन्यापूर्वी विकले. मग यावरुन सुनीता आणि शशी यांनी आईचे अंतीमसंस्कार थांबवले. दोघांनी मिथलेश हिच्यासोबत संपत्तीच्या वाटणीसाठी भांडण सुरु केले.

हे सुद्धा वाचा

वाटणी झाल्यावर अंत्यसंस्कार

आईची वाचलेली संपत्ती सुनीता आणि शशी आपल्या नावावर करुन घेण्यासाठी त्या मिथिलेशशी भांडत राहिल्या. परंतु मिथिलेश त्याला तयार नव्हती. खूप वेळापर्यंत बहिणींचा हा वाद सुरु होता. त्यामुळे स्मशानघाटावर काम करणाऱ्या लोकांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलीसांना तिन्ही मुलींना समजवण्यास अपयश आले. अखेर तीन बहिणीमध्ये स्टॅम्प पेपरवर वाटणी झाली. त्यात पुष्पा यांची राहिलेली संपत्ती शशी आणि सुनीता यांच्यावर केली. त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहे. या भांडणामुळे 8 ते 9 तास मृतदेह चित्तेवर होता. मुलींनी केलेल्या  या प्रकारामुळे गावातील सर्वच जण नाराज  झाले. कलयुग यालाच म्हणतात का? अशी चर्चाही गावकऱ्यांमध्ये होती.