परीक्षेच्या आधी दु:खाचा डोंगर कोसळला, खचून न जाता रुपल अशी बनली IAS अधिकारी

UPSC Success Story : आएएस किंवा आयपीएस होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. पण सगळ्यांनाच या परीक्षेत यश मिळत नाही. जी लोकं चिकाटी आणि मेहनत करतात त्यांना या परीक्षेत यश मिळतं. ते इतरांसाठी प्रेरणास्थान बनतात. असंच एक उदाहरण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिने कठीण काळात ही परीक्षा उत्तीर्ण करुन दाखवली.

परीक्षेच्या आधी दु:खाचा डोंगर कोसळला, खचून न जाता रुपल अशी बनली IAS अधिकारी
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 5:39 PM

IAS Officer : स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करणं सगळ्यांनाच जमत नाही. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कठोप परिश्रम घ्यावे लागतात. जिद्द ठेवावी लागते तेव्हा त्यात यश मिळतं. आतापर्यंत अनेकांनी मेहनतीच्या जोरावर या परीक्षा उत्तीर्ण करुन दाखवल्या आहेत. कठीण काळात ही जे अशा परीक्षा पास होतात त्या इतरांसाठी प्रेरणा ठरतात. असंच आणखी एक उदाहरण आहे. रुपलने तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली. तिचे वडील दिल्ली पोलिसात एएसआय आहेत. तिच्या यशात त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं ती सांगते.

रुपलची आई अंजू राणा यांनी मुलीचं मनोबल वाढण्याची भूमिका बजावली. अंजू यांनी रुपलला यश मिळावे म्हणून तिला प्रेरणा दिली. पण जेव्हा यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी ती करत होती तेव्हाच रुपलची आई आजारी पडली, त्यामुळे रुपलसाठी ती कठीण परिस्थिती होती.  आपल्या आजारी आईची काळजी घेत तिने मुख्य परीक्षेची तयारी सुरू ठेवली.

पेपर जवळ आला होता. रुपलकडून तयारी सुरु होती. पण तेव्हाच तिच्या आईचे निधन झालेय. पण यूपीएससीची मुख्य परीक्षा ती उत्तीर्ण झाली. आई-वडिलांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. पण रुपलच्या यशाच्या अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी तिची आई अंजू राणा याचं निधन झालं होतं.

पण या दु:खातही, रुपलचे वडील जसवीर राणा यांनी मुलीला खचू दिले नाही. ते तिच्या पाठीशी उभे राहिले. तिला पाठिंबा दिला आणि तिची ही कामगिरी दिवंगत आईला श्रद्धांजली असेल याची आठवण करून दिली. रुपलच्या बहिणीने सांगितले की, रुपलला तिच्या वडिलांच्या शब्दातून प्रेरणा मिळाली. आई गेल्याच्या दुखातून सावरुन तिने मेहनत सुरु ठेवली. यूपीएससीच्या मुलाखतीत ती यशस्वी झाली. तिला 26 वा क्रमांक मिळाला. तिचे वडील जसवीर राणा, भाऊ ऋषभ राणा आणि बहीण यांनी तिच्या या यशाबाबत आनंद व्यक्त केला.

रुपलची धाकटी बहीण स्वीटी राणा बहिणीच्या यशाबद्दल आनंदी होती पण काही उदास देखील होती. कारण या आनंदाच्या दिवशी तिची आई उपस्थित नव्हती. रुपलचा भाऊ ऋषभ राणा याने तिच्या यशासाठी तिची चिकाटी आणि दृढनिश्चय असल्याचं सांगितले.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.