हे फक्त बाई आणि आईच करु शकते, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्युटीवर!

आईचं आणि खाकी वर्दीचं कर्तव्य एकसाथ बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तोंडभरुन स्तुती केली. डीएसपी मोनिका सिंग यांच्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. त्यावेळी आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मॅडम मुख्यमंत्र्यांच्या सेवेला पोहोचल्या.

हे फक्त बाई आणि आईच करु शकते, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्युटीवर!
Follow us
| Updated on: Oct 21, 2021 | 11:22 AM

मुंबई : आईचं आणि खाकी वर्दीचं कर्तव्य एकसाथ बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याची मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तोंडभरुन स्तुती केली. डीएसपी मोनिका सिंग यांच्यावर मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती. त्यावेळी आपल्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन डीएसपी मॅडम मुख्यमंत्र्यांच्या सेवेला पोहोचल्या. आपल्या छातीवर त्यांनी कॅरिअर बॅग बांधली होती. त्या बॅगमध्ये दीड वर्षाच्या लेक होती. मातृत्वाचं आणि खाकी वर्दीचं कर्तव्य एकसाथ बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्याला पाहून शिवराज मामांना राहवलं नाही. त्यांनी डीएसपी मोनिका सिंग यांच्याशी अभिमानाने फोटो काढला आणि तो ट्विटरवरती शेअर केला.

डीएसपी मोनिका सिंग यांनी दीड वर्षाच्या मुलीला कॅरिअर बॅगमध्ये ठेऊन जिथे मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार आहे, त्या हेलिपॅडजवळ उभ्या होत्या. या दरम्यान, जेव्हा मुख्यमंत्री परत जाऊ लागले, तेव्हा त्यांची नजर महिला पोलीस अधिकाऱ्यावर पडली, त्यानंतर त्यांनी मोनिका सिंग यांची आपुलकीने चौकशी केले. चौकशीनंतर मोनिका आणि त्यांच्या दीड वर्षाच्या लेकीसोबत त्यांनी छानसला फोटोही काढला.

शिवराज मामांकडून तोंडभरुन स्तुती

शिवराज सिंह चौहान यांनी फोटो ट्विट करुन महिला अधिकाराऱ्यांची तोंडभरुन स्तुती केली. ते म्हणतात “अलीराजपूर भेटीदरम्यान, मी डीएसपी मोनिका सिंग आणि त्यांच्या दीड वर्षांच्या मुलीला पाहिलं. कर्तव्याप्रती त्यांचं समर्पण कौतुकास्पद आहे. मध्य प्रदेशला तुमचा अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो आणि चिमुरडीला खूप खूप आशीर्वाद देतो. ”

आईचं कर्तव्य आणि मुख्यमंत्र्यांची सेवा साथ-साथ!

सध्या धार जिल्ह्यात नोकरीस असलेल्या मोनिका सिंग यांनी पीटीआयला सांगितले की, “मी आपल्या मुलीला घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सेवेला गेली कारण मला धारपासून 145 किमी दूर अलीराजपूरला जायचे होते. मंगळवारी सकाळी जेव्हा मी आपल्या ड्युटीसाठी यायला निघाले, तेव्हा माझी मुलगीही झोपेतून उठली आणि सोबत येण्याचा हट्ट धरु लागली. मग मला त्यावेळी खूपच इमोशनल व्हायला झालं, मला एक आई म्हणून जबाबदारी पार पाडायची होती आणि एक पोलीस अधिकारी म्हणून माझे कर्तव्य निभवायचं होतं.”

कोण आहेत मोनिका सिंग?

ज्या महिला अधिकाऱ्याचं देशभरात कौतुक होतंय, त्यांचं नाव मोनिका सिंग असं आहे. ज्या मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यात पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) म्हणून काम करतात.

त्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरच्या हेलिपॅडवर तैनात होत्या. जोबात विधानसभा जागेसाठी आगामी पोटनिवडणुकीसाठी दोन दिवसांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मंगळवारी अलीराजपूरला आले होते.

(MP CM shivraj singh chouhan meet DSP Monika Singh Who Was Doing job For Cm Security And daughter Care)

हे ही वाचा :

भारताची ऐतिहासिक कामगिरी, 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण, जगभरात डंका

Video : प्रियंका गांधींना मिळाली अपघाताची माहिती, जखमी महिलेला स्वत: केली मलमपट्टी

UP Elections:उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी 160 महिला उमेदवार कॉंग्रेस शोधू शकेल का?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.