‘मंदिराच्या लाऊडस्पीकरमुळे ध्वनि प्रदूषण’, IAS शैलबालाच्या टि्वटवरुन वाद, काँग्रेसने म्हटलं योग्य मुद्दा
"त्यांनी कधी मोहर्रमच्या मिरवणुकीवर दगडफेक होताना बघितली आहे का?. पण हिंदुंच्या मिरवणुकीवर दगडफेक होते. त्यामुळे मार्टिन मॅडम तुम्हाला हिंदू धर्माच्या भावनांना धक्का पोहोचवण्याचा काहीही अधिकार नाही" असं चंद्रशेखर तिवारी म्हणाले.
मध्य प्रदेश सरकारमधील चर्चित IAS अधिकारी शैलबाला मार्टिन पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. शैलबाला मार्टिन यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म X वर मंदिरातील लाऊडस्पीकरबद्दल प्रश्न उपस्थित केलेत. त्यानंतर वाद सुरु झालाय. हिंदू संघटनेने त्यांच्या वक्तव्याचा विरोध केलाय. काँग्रेसने हा योग्य मुद्दा असल्याच म्हटलय. मंदिरातील लाऊड स्पीकर्समुळे अनेक दूरवरच्या गल्लीबोळापर्यंत ध्वनी प्रदूषण होतं, असं शैलबाला मार्टिन यांनी आपल्या X वरच्या पोस्टमध्ये म्हटलय. हे स्पीकर्स मध्यरात्रीपर्यंत सुरु असतात. त्यामुळे कोणाला अडचण येत नाही, असं त्यांचं म्हणण आहे. दुसऱ्या पोस्टला रिपोस्ट करत त्यांनी ही पोस्ट लिहिली आहे. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना संस्कृती बचाव मंचने यावर नाराजी व्यक्त केली.
एका युजरच्या कमेंटवर IAS शैलबाला यांनी रिप्लाय सुद्धा केलाय. “माननीय मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर एक आदेश काढलेला. त्यात सगळ्या धार्मिक स्थळावरुन लाऊडस्पीकर हटवण्याचा आणि डीजेवर बंदी घालण्याचा आदेश होता. या आदेशाची अमलबजावणी केली, सर्व समुदायाच्या धार्मिक स्थळावरुन लाऊडस्पीकर्स हटवले, डीजे बंद झाले, तर सर्वांना मोठा दिलासा मिळेल” असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलय.
‘मोहर्रमच्या मिरवणुकीवर दगडफेक होते का?’
“कोणी हिंदू धर्माच्या श्रद्धेला धक्का लावण्याच काम केलं, तर संस्कृती बचाव मंच त्यांचा विरोध करेल” असं संस्कृति बचाव मंचचे अध्यक्ष पंडित चंद्रशेखर तिवारी म्हणाले. “मंदिरात सुरेल आवाजात आरती आणि मंत्रोच्चारण होतं. दिवसात पाच वेळी लाऊडस्पीकरवर हे अंजान सारखं बोललं जात नाही. शैलबाला मार्टिन यांना माझा एक प्रश्न आहे, त्यांनी कधी मोहर्रमच्या मिरवणुकीवर दगडफेक होताना बघितली आहे का?. पण हिंदुंच्या मिरवणुकीवर दगडफेक होते. त्यामुळे मार्टिन मॅडम तुम्हाला हिंदू धर्माच्या भावनांना धक्का पोहोचवण्याचा काहीही अधिकार नाही” असं चंद्रशेखर तिवारी म्हणाले.
काँग्रेस प्रवक्ते अब्बास हफीज काय म्हणाले?
काँग्रेस प्रवक्ते अब्बास हफीज यांनी शैलबाला मार्टिन यांचं समर्थन केलं. “भाजपा सरकारमध्ये लाऊडस्पीकरवरील कारवाई राजकारणाने प्रेरित असते. धर्म पाहून लाऊडस्पीकरवर कारवाई होत असेल, तर यावर बोलणं हा एमपीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नाईलाज आहे” असं अब्बास हफीज म्हणाले.