AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mudhol Hounds : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील श्वानपथकात आता मुधोळचे श्वानही, जाणून घ्या मुधोळ हाऊंडसविषयी

कर्नाटकातील बागलकोट भागातील मुधोळ परिसरात हा कुत्रा आढळतो. मुधोल हाउंड हा कुत्रा त्याच्या विशेष कार्यशक्ती आणि शिकार करण्याच्या वृत्तीसाठी ओळखला जातो. हा जर्मन शेफर्ड कुत्र्यांपेक्षा वेगवान कुत्रा मानला जातो.

Mudhol Hounds : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील श्वानपथकात आता मुधोळचे श्वानही, जाणून घ्या मुधोळ हाऊंडसविषयी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील श्वानपथकात आता मुधोळचे श्वानहीImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 8:38 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देण्यात येणाऱ्या SPG सुरक्षाव्यवस्थेतील श्वान पथकात आता मुधोळचे श्वान समाविष्ट करण्यात येणार आहे. मुधोळ हाऊंड्स (Mudhol Hounds) नावाने कुत्र्यांची ही जात प्रसिद्ध आहे. मुधोल हाऊंड हे आधीच भारतीय हवाई दल आणि इतर सरकारी विभागात सेवा देत आहेत परंतु पंतप्रधानांच्या सुरक्षा दला (Security Force)त त्यांचा समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठा साम्राज्यातील मालोजीराव घोरपडे याच मुधोळवर राज्य करत होते. हा श्वान अद्याप लहान आहे. त्याला प्रथम प्रशिक्षण द्यावे लागेल. चार महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर त्याचा संघात समावेश होणार आहे. एप्रिल महिन्यात कॅनाइन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर तिम्मापूरने दोन महिन्यांची दोन नर पिल्ले एसपीजीकडे सुपूर्द केली.

जाणून घ्या मुधोळ हाऊंड्सची वैशिष्ट्ये

कर्नाटकातील बागलकोट भागातील मुधोळ परिसरात हा कुत्रा आढळतो. मुधोळ हाउंड हा कुत्रा त्याच्या विशेष कार्यशक्ती आणि शिकार करण्याच्या वृत्तीसाठी ओळखला जातो. हा जर्मन शेफर्ड कुत्र्यांपेक्षा वेगवान कुत्रा मानला जातो. देशी जातीच्या कुत्र्यांमध्ये मुधोळ हाउंड्स ही सर्वात शिकारी गुणवत्ता, निष्ठावान आणि निरोगी प्रजाती मानली जाते. याच कारणामुळे पहिल्यांदाच देशी जातीच्या कुत्र्याला प्रथम भारतीय हवाई दलात आणि आता SPG पथकात समाविष्ट करण्यात आले आहे.

मुधोळ हाऊंड्स हरणासारखा उंच, काटक आणि प्रचंड रागीट असतो. ओळखीशिवाय कुणाचाही स्पर्श सहन करत नाही. याचे कान लांब असतात. शेपटी जमिनीपर्यंत पोचते. चेहराही सामान्य कुत्र्यांपेक्षा अधिक निमुळता असतो. ही कुत्री उंचीमुळे इतरांपेक्षा वेगळी दिसतात. जे काम जर्मन शेफर्ड कुत्रे 90 सेकंदात पूर्ण करतात, ते काम मुधोळ हाऊंड्स अवघ्या 40 सेकंदात पूर्ण करतात.

हे सुद्धा वाचा

इंग्रजांनाही मुधोळ हाऊंड्सची भुरळ

मुधोळ हाऊंड्सने इंग्रजांनाही भुरळ पाडल्याचा इतिहास आहे. इंग्लंडचे पाचवे किंग जॉर्ज भारतात आले तेव्हा जे चार जातीचे श्वान दाखवले होते त्यात मुधोळच्या कुत्र्यांचा समावेश होता. “How beautiful hounds of Mudhol” असं किंग जॉर्जने म्हटल्यापासून या कुत्र्यांना मुधोळ हाऊंड्स असे नाव पडले. (Mudhol Hounds are now in the dog squad of Prime Minister Narendra Modi security system)

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.