Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांनी खरेदी केलं आणखी एक घर, किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल

मुकेश अंबानींचा हा व्यवहार दुबईतील सर्वात महागड्या निवासी व्यवहारापैकी एक असल्याचेही सांगितले जात आहे.

Mukesh Ambani | मुकेश अंबानी यांनी खरेदी केलं आणखी एक घर, किंमत ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 10:31 PM

नवी दिल्लीः भारतातील बडे उद्योगपती आणि आशियातील दोन नंबरचे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आता स्वतःचाच विक्रम मोडला आहे. रिलायन्सच्या अध्यक्षांनी यापूर्वी दुबईमध्ये (Dubai)80 मिलियन डॉलरमध्ये एक राहण्यासाठी जागा खरेदी केली होती. आणि आता त्यापेक्षा दुप्पट किंमतीत एक आलिशान बंगलाही खरेदी केला आहे. या घराची किंमत सुमारे 163 मिलियन डॉलर ($163 million) असल्याचे सांगितली जात आहे.

मुकेश अंबानी यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये दुबईमध्ये हा दुसरी मोठी मालमत्ता खरेदी केली आहे. ही मालमत्ता कुवैती टायकून मोहम्मद अलशाया यांच्याकडून पाम जुमेराह मॅन्शन सुमारे 163 मिलियन डॉलरला विकत घेतल्याचे अहवालात म्हटले आहे.

मुकेश अंबानींचा हा व्यवहार दुबईतील सर्वात महागड्या निवासी व्यवहारापैकी एक असल्याचेही सांगितले जात आहे.

कुवेतमध्ये व्यवसाय समूहकडे स्टारबक्स, एच अँड आणि व्हिक्टोरियज सिक्रेट यासह प्रमुख किरकोळ ब्रँडसाठी स्थानिक फ्रेंचायझीही देण्यात आल्या आहेत.

मुकेश अंबानी यांनी पाम जुमेराहमध्ये मालमत्ता खरेदी केल्यानंतर, जगातील इतर अनेक श्रीमंत लोकांनी या भागात मालमत्ता खरेदी करण्याची स्पर्धा लावली आहे.

मुकेश अंबानी यांनी दुबईमध्ये विकत घेतलेला जुमेराह हवेली त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला 80 मिलियन डॉलरला विकत घेतली होती. च्याच वास्तूपासून ही वास्तू अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

आधीच्या ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 2022 च्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठी पाम जुमेरा बीचवर हा विला विकत घेतला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मागील वर्षी, रिलायन्स समूहाने यूकेमध्ये स्टोक पार्क लिमिटेड खरेदी करण्यासाठी 79 मिलियन डॉलर खर्च केले होते. यामध्ये जॉर्जियन काळातील वास्तूचा समावेश आहे.

जो मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीसाठी विकत घेतला होता. तर दुसरीकडे मुकेश अंबानी आता न्यूयॉर्कमध्येही कोट्यवधीची मालमत्ता खरेदी केल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, फोर्ब्सच्या अहवालानुसार रिलायन्स चेअरमन 88.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वात जास्त श्रीमंत व्यक्ती आहेत आणि गौतम अदानी नंतरही तेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा अहवाल फोर्ब्सने छापला होता.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....