NIA, RAW, SWAT Team आणि खास विमान…दहशतवादी तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी असा सीक्रेट प्लॅन
Mumbai Attack Tahawwur Rana : दहशतवादी तहव्वूर राणा याला पटियाला हाऊस कोर्टात सादर करण्यात येऊ शकते. सुरक्षेच्या कारणामुळे त्याला व्हर्च्युअली, ऑनलाईन NIA च्या न्यायमूर्तींसमोर हजर करण्यात येऊ शकते. त्याची अगोदर आरोग्य तपासणी करण्यात येऊ शकते.

26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा अगदी थोड्याच वेळात भारतात दाखल होत आहे. अमेरिकेकडून त्याचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे. त्याला विशेष विमानाने राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि RAW ची टीम भारतात आणत आहेत. हे विमान दिल्ली विमानतळावर उतरणार आहे. दहशतवादी तहव्वूर राणा याला पटियाला हाऊस कोर्टात सादर करण्यात येऊ शकते. सुरक्षेच्या कारणामुळे त्याला व्हर्च्युअली, ऑनलाईन NIA च्या न्यायमूर्तींसमोर हजर करण्यात येऊ शकते. त्याची अगोदर आरोग्य तपासणी करण्यात येऊ शकते.
सदानंद दाते यांच्या नेतृत्वात राणा देशात
एनआय आणि रॉ ची संयुक्त टीम तहव्वूर राणा याला भारतात आणत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएच्या DIG जया रॉय यांनी मंगळवारी तहव्वूर राणा याच्या सरेंडर वॉरंटवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर त्याची प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगाने पुढे गेली. राणा याला घेऊन भारतीय तपासण यंत्रणा एका विशेष विमानाने बुधवारी सकाळी जवळपास 6:30 वाजता दिल्लीसाठी रवाना झाले.




सदानंद दाते यांच्या नेतृत्वात एनआयएची टीम त्याला घेऊन येत आहे. दाते हे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्यावेळी सदानंद दाते हे मुंबईत गु्न्हे शाखेत कार्यरत होते. भारतात पोहचल्यावर एनआयएची टीम राणा याला अधिकृतरित्या ताब्यात घेईल. दिल्ली पोलिसांची स्वतंत्र टीम सुद्धा हाय अलर्टवर आहे. तर SWAT चे कमांडो सुद्धा विमानतळावर तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय विमानतळ परिसरात केंद्रीय राखीव पोलीस दल आणि स्थानिक पोलिसांचा गराडा आहे.
एनआयएच्या कार्यालयात हजर
तहव्वूर राणा याला एनआयएच्या कार्यालयात हजर करण्यात येईल. त्यादृष्टीने कार्यालयाजवळील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. राणा याला पटियाला हाऊस कोर्टात सादर करण्यात येऊ शकते. सुरक्षेच्या कारणामुळे त्याला व्हर्च्युअली, ऑनलाईन NIA च्या न्यायमूर्तींसमोर हजर करण्यात येऊ शकते. त्याची अगोदर आरोग्य तपासणी करण्यात येऊ शकते. थोड्याच वेळात त्याला देशात आणण्यात येत आहे.