बुलेट ट्रेनचा महत्वाचा टप्पा, 100 मीटर लांब अन् चार मजली इमारतीचा पूल तयार
bullet train project bridge: मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे लाइन निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरु आहे. गुजरातमधील नऊ आणि महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधून ही बुलेट रेल्वे जाते. महाराष्ट्रातून 156 किमी, नगर हवेलीत 4 किमीचा रेल्वे मार्ग आहे.
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान सुरु होणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. सिलवासा, दादरा आणि नगर हवेली दरम्यान 100 मीटर लांब आणि चार मजली इमारतबरोबर असणारा पूल तयार केला गेला आहे. हा पूल तामिळनाडूमधील त्रिचीमध्ये तयार केला गेला. त्यानंतर ट्रेलर अन् ट्रन्सपोर्टच्या माध्यमातून मुंबईत आणला गेला. हा पूल जोडताना त्या ठिकाणी असलेल्या रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांचा जणू श्वासच थांबला होता.
प्रकल्पात एकूण 28 पूल
नॅशनल हाई स्पीड रेल कॉर्पोरेशननुसार 508 किमी लांब मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टमध्ये एकूण 28 स्टील ब्रिज आहे. त्यातील दादरा आणि नगर हवेली येथील पूल चौथा आहे. हा पूल 1464 मेट्रीक टनाचा आहे. त्याची उंची 14.6 मीटर आणि रुंदी 14.3 मीटर आहे. हा संपूर्ण पूल ”मेक इन इंडिया”चा प्रकल्पावर आधारित आहे. त्यासाठी जपानच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
सुरक्षितता आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेची उच्च पातळी राखून बुलेट ट्रेन प्रकल्प तयार केला जात आहे. जपानी तंत्रज्ञाचा फायदा घेऊन “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत हा मार्ग तयार होत आहे. भारत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्वतःची तांत्रिक आणि भौतिक संसाधने वाढवत आहे. या प्रकल्पासाठीचा हा पोलादी पूल त्याचे उदाहरण आहे.
असा आहे प्रकल्प
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे लाइन निर्मितीचे काम सध्या वेगाने सुरु आहे. गुजरातमधील नऊ आणि महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांमधून ही बुलेट रेल्वे जाते. महाराष्ट्रातून 156 किमी, नगर हवेलीत 4 किमीचा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पात 12 स्टेशन बनवण्यात येणार आहे. रेल्वेचा वेग 320 किमी प्रतीतास असणार आहे. या रेल्वेमुळे मुंबई ते अहमदाबाद अंतर दोन तासांत गाठता येणार आहे.
100 m long ‘Make in India’ steel bridge launched in Silvassa, Dadra & Nagar Haveli for the Bullet Train Project. Weighing 1464 MT, this bridge stands 14.6 m tall and 14.3 m wide. This is the fourth steel bridge to be completed. pic.twitter.com/eGlHAfnKNZ
— NHSRCL (@nhsrcl) August 26, 2024
बुलेट ट्रेन सहा मार्गांवर चालवण्याची योजना
बुलेट ट्रेन सहा मार्गांवर चालवण्याची योजना आहे. दिल्ली- अमृतसर, हावडा-वाराणसी-पटना, दिल्ली-आग्रा- लखनऊ-वाराणसी, दिल्ली –जयपूर-उदयपूर-अहमदाबाद, मुंबई-नाशिक-नागपूर, मुंबई-हैदराबाद कॉरिडोर असे हे मार्ग आहेत.