मुंबईची ओळख असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ला तडे, काय करणार मंत्र्यांनी सांगितले लोकसभेत
मुंबईचे वैभव असलेल्या गेटवे ऑफ इंडियाच्या तपासणीदरम्यान पृष्ठभागावर काही तडे दिसून आली आहेत. ‘गेटवे ऑफ इंडिया’ च्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बाब समोर आलीय. मुंबईच्या समुद्र किनारी १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली होती.
नवी दिल्ली : वयाच्या शंभरीत पदार्पण केलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’ या ऐतिहासिक इमारतीला तडे गेले आहे. १९११ मध्ये पाचवा जॉर्ज आणि राणी मेरी यांनी भारताला दिलेल्या भेटीचे स्मारक म्हणून ही भव्य कमान बांधण्यात आली होती. याची पायाभरणी ३१ मार्च, १९१३ रोजी करण्यात आली व १९२४ मध्ये ही इमारत बांधून पूर्ण झाली. परंतु आता या इमारतीला भेगा पडल्या आहेत. ‘गेटवे ऑफ इंडिया’ च्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बाब समोर आलीय, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
‘गेट वे ऑफ इंडिया’ नेमके काय झाले
मंत्री किशन रेड्डी यांनी सांगितले की, गेटवे ऑफ इंडियाच्या तपासणीदरम्यान पृष्ठभागावर काही तडे दिसून आली आहेत. परंतु इमारतीची एकंदरीत रचना चांगल्या स्थितीत आहे. यासंदर्भात नुकताच केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये ही बाब समोर आलीय.
महाराष्ट्र सरकारच्या संरक्षण
गेटवे ऑफ इंडिया हा एक केंद्रीय संरक्षित स्मारक नाही, तर महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व आणि संग्रहालय विभागाच्या संरक्षणात आहे. या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यात काही ठिकाणी तडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु इमारतीचे एकंदरीत रचना उत्तम परिस्थितीत आहे. इमारतीवर अनेक ठिकाणी झाडे, झुडपेही आलीय. इमारतीवरील वॉटरप्रूफिंग व सीमेंट काँक्रीटचे नुकसान झालेय. त्यानंतर त्याचा दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आलाय.
निधी केला मंजूर
पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाने सविस्तर आराखडा तयार केला आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या संवर्धन आणि दुरुस्तीसाठी 8 कोटी 98 लाख 29 हजार 574 रुपये मंजूर करण्यात आले आहेत.राष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने 10 मार्च रोजी त्यास मान्यता दिली आहे.