UP Murder : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेट स्वीकारली नाही, माथेफिरुने अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला भोसकले

नागला बोहरा गावचे रहिवासी असलेले निवृत्त सैनिक तेजवीर सिंग हे फरीदाबाद (हरियाणा) येथील एका कारखान्यात सुरक्षा कर्मचारी आहेत. रविवारी संध्याकाळी उशिरा ते घरी नसताना मुझफ्फरनगरच्या ठाणे मंडी भागातील कुकडा गावातील रवी हा तरुण लग्नपत्रिका घेऊन त्यांच्या घरी पोहोचला. या लग्नपत्रिकेत त्याने चाकू लपवून आणला होता.

UP Murder : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेट स्वीकारली नाही, माथेफिरुने अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला भोसकले
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेट स्वीकारली नाही, माथेफिरुने अल्पवयीन मुलीसह तिच्या आईला भोसकलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 7:00 PM

उत्तर प्रदेश : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट (Facebook Friend Request) स्वीकारली नाही म्हणून एका माथेफिरु तरुणाने घरात घुसून मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात घडली आहे. यावेळी मुलीला वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही आरोपीने धारदार शस्त्राने वार (Attack) केले. या घटनेत मुलीचा मृत्यू (Death) झाला आहे तर आई गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी महिलेवर सिटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील हायवे पोलिस स्टेशन हद्दीतील नागला बोहरा गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी असे आरोपी तरुणाचे नाव असून तो मुझफ्फरनगरचा रहिवासी आहे.

लग्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने घरी आला आणि हत्या केली

नागला बोहरा गावचे रहिवासी असलेले निवृत्त सैनिक तेजवीर सिंग हे फरीदाबाद (हरियाणा) येथील एका कारखान्यात सुरक्षा कर्मचारी आहेत. रविवारी संध्याकाळी उशिरा ते घरी नसताना मुझफ्फरनगरच्या ठाणे मंडी भागातील कुकडा गावातील रवी हा तरुण लग्नपत्रिका घेऊन त्यांच्या घरी पोहोचला. या लग्नपत्रिकेत त्याने चाकू लपवून आणला होता. यावेळी त्यांची 16 वर्षांची मुलगी खोलीत येताच, त्याने कार्डच्या आत लपवलेला चाकू काढला आणि तिच्यावर अनेक वार केले. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट न स्वीकारल्याने तरुणाने हे कृत्य केले. मुलीची हत्या केल्यानंतर तरुणानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, असे एसपी मार्तंड प्रकाश सिंह यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Murder of 16 year old girl for not accepting friend request on Facebook in Uttar Pradesh)

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.