Chennai Crime: मुलींचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या, पीडित तरुणींनीच काढला काटा

पोलीस चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमकुमारने अनेक मुलींसोबत मैत्री केली होती आणि त्यांचे कथित अश्लील फोटोही काढले होते. याच फोटोंच्या आधारे तो मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. आतापर्यंत प्रेमकुमारला जवळपास दीड लाख रुपये दिल्याचे पीडित तरुणींचे म्हणणे आहे.

Chennai Crime: मुलींचे अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची हत्या, पीडित तरुणींनीच काढला काटा
व्हॉट्सअपवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकली, मग विष प्राशन करुन आत्महत्या
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 4:46 PM

चेन्नई : मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करत पैसे उकळणाऱ्या नराधमाचा पीडित तरुणींनी मित्राच्या मदतीने काटा काढला आहे. आरोपीला पैसे घेण्यासाठी एका निर्मनुष्य ठिकाणी बोलावून त्याची हत्या करण्यात आली. प्रेमकुमार असे मयत तरुणाचे नाव असून तो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करायचा

पोलीस चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार प्रेमकुमारने अनेक मुलींसोबत मैत्री केली होती आणि त्यांचे कथित अश्लील फोटोही काढले होते. याच फोटोंच्या आधारे तो मुलींना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे उकळायचा. आतापर्यंत प्रेमकुमारला जवळपास दीड लाख रुपये दिल्याचे पीडित तरुणींचे म्हणणे आहे. मात्र तरीही तो शांत बसत नव्हता. वारंवार पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. यामुळे तरुणींनी प्रेमकुमारचा कायमचा काटा काढायचे ठरवले.

इन्स्टाग्रामवरील मित्राच्या मदतीने केली हत्या

प्रेमकुमारचा काटा काढण्यासाठी या तरुणींनी आपल्या इन्टाग्रामवरील एका मित्राची मदत घेतली. तरुणींनी आपल्या या मित्रासोबत मिळून प्रेमकुमारच्या हत्येचा प्लान केला. जेव्हा प्रेमकुमारने पुन्हा पैसे मागितले तेव्हा तरुणींनी त्याला रेडहिल्स येथील निर्मनुष्य ठिकाणी पैसे घेण्यासाठी बोलावले. प्रेमकुमार आपल्या एका जोडीदारासोबत तेथे पैसे घेण्यासाठी आला असता. प्लाननुसार आधीच दबा धरुन बसलेल्या गँगने त्याला घेरले आणि काही कळण्याच्या आत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून प्रेमकुमारचा साथीदार तेथून पळून गेला.

हत्येनंतर मृतदेह जमिनीत गाडला

आरोपींना प्रेमकुमार जबर मारहाण केली. या मारहाणीत प्रेमकुमारचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रेमकुमारचा मृतदेह ओसाड जमिनीत पुरला. प्रेमकुमारला मारहाण होताना त्याच्या साथीदार फरार झाला आणि त्याने घरच्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रेमकुमारच्या नातेवाईकांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी मुलींच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. पोलीस आरोपींना घेऊन प्रेमकुमारला ज्या ठिकाणी गाडले होते तेथे घेऊन गेले आणि प्रेमकुमारचा मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. (Murder of a youth in chennai who blackmailed by taking pornographic photos of girls)

इतर बातम्या

Pune Crime |अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नीच्या विरोधात ईडीकडे तक्रार ; मृत व्यक्तीला जिवंत दाखवत जमीन बळकावली

मोठी बातमी! 20 Youtube Channel आणि 2 वेबसाईट्सवर केंद्राची बंदी!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.