इंस्टाग्रामवर हिंदू नाव ठेऊन मुलींना जाळ्यात ओढायचा युवक, असा झाला भांडाफोड

इंदूरच्या भंवरकुआन भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्याला भेटायला पुण्याहून सदन सादिक खान आला. बजरंग दलाचा आरोप आहे की, त्याने इंस्टाग्रामवर नाव बदलून हिंदू मुलींशी मैत्री करत होता. त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता

इंस्टाग्रामवर हिंदू नाव ठेऊन मुलींना जाळ्यात ओढायचा युवक, असा झाला भांडाफोड
हिंदू नाव वापरुन मुलींची फसवणूक करणारा युवकImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 10:45 AM

इंदूर : राज्यात लव्ह जिहादविरोधात (love jihad)कायदा करण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकार करत असताना हिंदू मुलींच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे आमिष दाखवून, ओळख लपवून हिंदू मुलींची फसवणुकीचे अनेक प्रकार उजडेत आहे. यामुळे उत्तर प्रदेशात जसा लव्ह जिहादचा कायदा आहे तसा महाराष्ट्रात सुद्धा लागू करावा यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. आता पुणे शहरातील (Pune Youth)मुस्लिम युवकाने इंदूरमधील हिंदू मुलीला फसवल्याचा प्रकार उघड झाला. एका रिक्षा चालकाच्या सावधगिरीमुळे हा प्रकार समोर आला. हिंदूत्ववादी संघटनांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले.

इंदूरच्या भंवरकुआन भागात महाविद्यालयीन विद्यार्थ्याला भेटायला पुण्याहून सदन सादिक खान आला. बजरंग दलाचा आरोप आहे की, त्याने इंस्टाग्रामवर नाव बदलून हिंदू मुलींशी मैत्री करत होता. त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला पकडून भंवरकुवान पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भंवरकुवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदन सादिक खान, (रा. ताडीवाल रोड, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

कसा उघड झाला प्रकार

हे सुद्धा वाचा

बजरंग दलाचे विभाग संयोजक तन्नू शर्मा यांनी सांगितले की, सदन खान एका कॉलेजच्या विद्यार्थ्यासोबत आयटी पार्कमध्ये बसला होता. संघटन मंत्री विपीन राठोड, राहुल पांडे आणि बजरंग दलाचे इतर कार्यकर्ते येथे पोहोचले. आधी नाव आणि पत्ता विचारल्यावर तो स्वतःला हिंदू म्हणवून घेत होता. त्याच्याकडून ओळखपत्र मागताच त्याने आपले नाव सदन सादिक खान सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या त्या मुलीला तो हिंदू नसून मुस्लिम असल्याचे प्रथमच समजले. तिने सांगितले की, तो हिंदू नाव वापरुनच माझ्याशी मोबाईलवर बोलत होता. तो मला भेटायला पुण्याहून इंदूरला आला. आधी हॉटेलला बोलावून मग मला आयटी पार्कमध्ये घेऊन आला.

रिक्षाचालकाने केला भांडाफोड सादीक खान आणि ती विद्यार्थीनी एका ऑटोमध्ये बसवले होते. त्यावेळी सदन मित्रांशी मोबाइलवर बोलत होता. ती विद्यार्थी बॅग घेऊन वसतिगृहातून बाहेर पडली तेव्हा रिक्षाचालकाला सादीकवर संशय आला. त्याने ही माहिती हिंदुत्ववादी संघटनांना दिली.

मोबाईलमध्ये मुलींसोबतचे अश्लील फोटो बजरंग दलाचे विभाग संयोजक तन्नू शर्मा यांनी सांगितले की, इंदूरच्या तरुणीशिवाय इतर मुलींसोबत त्याने काढलेले अश्लील फोटो सापडले आहेत. सदन खानने सांगितले की, तो हिंदू बनून या सर्व हिंदू मुलींना भेटत असे. पोलिसांनी त्या विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनाही पोलिस ठाण्यात बोलावले. मात्र विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.