माय होम कन्स्ट्रक्शन ‘डीएल शाह क्वालिटी प्लॅटिनियम’ने सन्मानित; गोयल यांच्या हस्ते पुरस्कार
गुणवत्ता ही खरेदी करून येत नाही. उलट गुणवत्तेमुळे खर्चात बचत होते. गुणवत्ता ही ब्रँड इंडियाला परिभाषित करेल. जेव्हा गुणवत्ता मानकांमध्ये दिली जाते तेव्हा विश्वासहार्यता आपोआपच वाढते, असं त्यांनी सांगितलं.
नवी दिल्ली: बांधकाम व्यवसायातील अग्रणी माय होम कन्स्ट्रक्शनला (My Home Constructions) भारतीय गुणवत्ता परिषदेत (Quality Council of India ) ‘डीएल शाह क्वालिटी प्लॅटिनियम’ पुरस्कार देण्यात आला आहे. तर्कक्षया (Tarkshya) प्रकल्पाच्यासाठी माय होम कन्स्ट्रक्शनला हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी भारतातील सर्वोच्च स्वायत्त गुणवत्ता संस्था क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाकडून हा पुरस्कार दिला जातो.
भारतीय गुणवत्ता परिषद (क्यूसीआय)ने 25 वर्ष पूर्ण केले आहेत. त्यानिमित्ताने पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. माय होम कन्स्ट्रक्शन गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून घरे बांधण्याचं काम करत आहे. आपल्या ग्राहकांच्या अपेक्षांची पूर्ती करून हैदराबादच्या रिअल इस्टेट बाजारात अग्रणी बनण्याचा या कंपनीचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. गुणवत्ता, विश्वासहार्यता आणि अखंडता या तीन मंत्रावर ही संस्था सुरू आहे. हे तीन मंत्रच या संस्थेचे मार्गदाता आहेत.
नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते माय होम कन्स्ट्रक्शनला डीएल शाह क्वालिटी प्लॅटिनियम पुरस्कार देण्यात आला. #QualityCouncilofIndia #SilverJubilee #MyHomeConstruction #Tarkshya pic.twitter.com/bUyR0WyFN7
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2022
डीएल शाह क्वालिटी पुरस्कार 2007पासून सुरू करण्यात आले. या पुरस्काराचे हे यंदाचे 14 वे वर्ष आहे. प्रकल्प यशस्वी करणारी संस्था म्हणून या संस्थेला देशात मान्यता मिळालेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रक्रिया, उत्पादने आणि सेवांमध्ये सतत सुधारणा, चांगल्या आणि प्रभावी ऑपरेशन्स आदींमुळे ग्राहक आणि भागधारकांचे समाधान कैक पटीने झाले आहे.
माय होम कन्स्ट्रक्शनचे वरिष्ठ अध्यक्ष एम. के. रवी साई यांनी माय होम कन्स्ट्रक्शन, पुरुषोत्तमच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. गोयल यांनी आपल्या भाषणात गुणवत्तेवर अधिकर भर दिला. गुणवत्तेमुळे नेहमीच खर्चात बचत होते, असं त्यांनी सांगितलं.
गुणवत्ता ही खरेदी करून येत नाही. उलट गुणवत्तेमुळे खर्चात बचत होते. गुणवत्ता ही ब्रँड इंडियाला परिभाषित करेल. जेव्हा गुणवत्ता मानकांमध्ये दिली जाते तेव्हा विश्वासहार्यता आपोआपच वाढते, असं त्यांनी सांगितलं.