My India My Life Goals: या तरुणाने बदललं मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याचं चित्र, पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक

अफरोजने हे समुद्र स्वच्छतेचे काम दोन लोकांसोबत सुरू केले होते, आता जवळपास 70 हजार लोक त्याच्याशी जोडले गेले आहेत. पीएम मोदींनी अफरोजच्या प्रयत्नाचे कौतुकही केले आहे.

My India My Life Goals: या तरुणाने बदललं मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याचं चित्र, पंतप्रधान मोदींकडूनही कौतुक
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 5:16 PM

मुंबई : तु्म्ही मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहत असाल, तर तुम्हाला मुंबईचं जीवन नक्कीच माहित असेल. येथे लोकं किती व्यस्त असतात. तुमचे काम तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक असते. आज देशातील सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये धावपळीमुळे प्रत्येक व्यक्तीला स्वत:साठी वेळ मिळत नाही हे उघड आहे. पण, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत राहणारा अफरोज इतरांपेक्षा वेगळा आहे. ३३ वर्षीय अफरोज शाह हा पेशाने वकील आहे आणि इतर तरुणांप्रमाणे त्याने मुंबईतील अस्वच्छतेसाठी ओळखला जाणारा वर्सोवा बीच स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे.

दोन वर्षांपूर्वी वर्सोवा समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा अफरोजचा प्रवास सुरू झाला. तो रोज समुद्रकिनारी जायचा आणि तिथली घाण साफ करण्याचा एकट्याने प्रयत्न करायचा. काही दिवस सर्वजण हे पाहत राहिले, पण नंतर बघता बघता लोकांमध्येही ही जाणीव वाढू लागली. अफरोजला घाण उचलताना पाहून लोक जागरूक झाले. आणि त्याच्या कामात सहभागी झाले.

2 ते 70 हजार लोकांचा सहभाग

मुंबईतील या तरूणासोबत समुद्र स्वच्छ ठेवण्यासाठी स्वेच्छेने काम करणाऱ्यांची संख्या ७० हजारांहून अधिक झाली आहे. पेशाने वकील असलेल्या अफरोजला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या रेडिओ कार्यक्रमात त्यांचे नाव घेतले तेव्हा त्यांना देशात ओळख मिळाली.

अफरोजने दोन लोकांसह समुद्र स्वच्छ करण्याचे हे काम सुरू केले आणि हळूहळू लोक त्यात सामील होत गेले. वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावरून आतापर्यंत 100 दशलक्ष प्लास्टिकचे तुकडे समुद्रात जाण्यापासून रोखण्यात आले आहेत. अफरोज शाह यांच्या मते, या जगातून कमी होत जाणारे प्रत्येक प्लास्टिक हा त्यांचा आणि त्यांच्या योद्धांचा विजय आहे.

‘देशाकडून मागू नका, देशासाठी द्या’

देशाकडून मागणाऱ्यांना संदेश देत अफरोज म्हणतो की, देशाने तुम्हाला खूप काही दिले आहे, आता मागण्याऐवजी देण्याची वेळ आली आहे. केवळ राष्ट्रीय दिवसांवर जाऊन देशावर प्रेम करण्याविषयी बोलणे आता पुरेसे नाही. महासागर आणि आपले पर्यावरण वाचवण्यासाठी धैर्य लागते. मानवाच्या सामर्थ्याला आपण कोणत्याही प्रकारे कमी लेखू नये हे या तरुण वकिलाने सिद्ध केले आहे. एखादे मोठे सामाजिक उद्दिष्ट या शक्तींनीच साध्य होऊ शकते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.