देशात 80 कोटी लोक गरीब, युवकांनी आठवड्यात 70 तास काम करावेच…नारायण मूर्तींचा पुन्हा एकदा सल्ला
narayana murthy: एखाद्या देशाने भांडवलशाही स्वीकारली तर ते चांगले रस्ते, चांगल्या गाड्या आणि चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करतील. भारतासारख्या गरीब देशात भांडवलशाही रुजली नव्हती. त्यामुळे मला लक्षात आले की मला परत येऊन उद्योजकतेचे प्रयोग करायचे आहेत.
देशात 80 कोटी लोक गरीब आहेत. कारण रेशनमधून 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जाते. यामुळे आपणास आपल्या अपेक्षा वाढवल्या पाहिजे. यामुळे युवकांनी आठवड्यात 70 तास काम करावे. आपण कोठर मेहनत करुन देशाला क्रमांक एकवर नेले पाहिजे. जर आपण कठोर मेहनत केली नाही तर कोण कठोर मेहनत करणार? असा सवाल नारायण मूर्ती यांनी विचारला. कोलकोतामधील इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या शताब्दी समारोहात ते बोलत होते.
नारायण मूर्ती म्हणाले, इन्फोसिसमध्ये असताना मी म्हटले होते. आम्ही सर्वश्रेष्ठ कंपन्यांमध्ये जाणार आहोत. त्यानंतर आमची तुलना सर्वश्रेष्ठ कंपनीमध्ये होईल. एकदा आपली तुलना सर्वश्रेष्ठ ग्लोबल कंपन्यांशी झाली तर आम्ही भारतीयांकडे करण्यासारखे खूप काही असणार आहे.
माझे समाधान झाले नाही…
नारायण मूर्ती म्हणाले, १९७० च्या दशकात मला पॅरीसमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी संभ्रमात होतो. कारण पाश्चत्य देशांत चर्चा होत होती, भारतात स्वच्छता नाही. भ्रष्टाचार खूप आहे. गरीबी आहे. रस्त्यांवर खड्डे असतात. दुसरीकडे पश्चिमी देशात प्रत्येक जण समृद्ध होता. रेल्वे वेळेवर येत होत्या. त्यामुळे मी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्याची भेट घेतली. त्याने सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. परंतु माझे समाधान झाले नाही.
नारायण मूर्ती म्हणाले की, एखाद्या देशाने भांडवलशाही स्वीकारली तर ते चांगले रस्ते, चांगल्या गाड्या आणि चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करतील. भारतासारख्या गरीब देशात भांडवलशाही रुजली नव्हती. त्यामुळे मला लक्षात आले की मला परत येऊन उद्योजकतेचे प्रयोग करायचे आहेत. मला कोणीतरी सांगितले चीन कर्मचारी आपल्यापेक्षा ३.५ जास्त प्रॉडक्टीव्ह आहे.
नारायणमूर्ती यांनी सांगितले की, माणूस विचार करू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. देवाने आपल्याला विचार करण्याची क्षमता दिली आहे. हे आपल्याला आपल्यापेक्षा कमी भाग्यवान लोकांबद्दल विचार करण्यास पात्र बनवते. बाकी जगाने भारताचा आदर करायचा हे ठरवावे लागेल.
नारायणमूर्ती यांनी मागील वर्षी ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. २०२३ मध्ये नारायण मूर्ती यांनी देशातील युवकांना ७० तास काम करण्याचे सांगितले होते. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. काही जणांनी त्यांच्या वक्तव्यावर टीका केली तर अनेकांनी पाठिंबा दिला.