जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी…जिथे शुट झालं ते स्टेशन वर्षांनुवर्षे रेल्वेची तिजोरी भरतंय, कशी ते पाहा
फिल्म शूटिंगची परवानगी देण्यासाठी कमीत कमी वेळ लागावा यासाठी मध्य रेल्वेने'एक खिडकी योजना'सुरु केली आहे.येथे चित्रपटाचे स्क्रीप्ट आणि अन्य दस्ताऐवज सादर करावे लागतात.

भारतीय रेल्वेला लाईफ लाईन म्हटलं जातं. सर्व सामान्य माणसाला लांबचा स्वस्त प्रवास घडविण्यासाठी रेल्वेची मदार माल वाहतूकीवरच असते. तिकिटांतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा गाडी चालवण्याचा खर्च अधिक असतो. त्याची भरपाई नेहमी मालवाहतूक करून रेल्वे करीत आहे. परंतू रेल्वेने आपली स्थानके चित्रपट शुटिंगसाठी देऊनही चांगली कमाई केली आहे. मध्य रेल्वेने चित्रीकरणासाठी रेल्वे स्थानके आणि परिसरातल्या जागा देऊन गेल्या आर्थिक वर्षात (2024-25 ) मध्ये सुमारे 40.13 लाख रुपये कमावले आहेत.
पनवेल जवळचे आपटा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर शुटिंगकरणे चित्रपट निर्मात्यांना सर्वाधिक पसंत आहे , येथील काजोल आणि शाहरुख खानच्या ‘डीडीएलजे’चे शुटिंग झाले होते. विविध फिल्म निर्माते आणि प्रोडक्शन हाऊसने मध्य रेल्वेच्या विविध स्थानकांवर 3 नेटफ्लिक्स चित्रपट, 2 वेब सिरीज, 1 प्रादेशिक चित्रपट आणि 1 जाहिरात फिल्म सह एकूण 7 फिल्मी शूटिंग पूर्ण झाली आहेत.
मध्य रेल्वेने कथा पिक्चर्स प्रोडक्शनच्या ‘गांधारी’ च्या शूटिंगमधून सर्वाधिक 17.85 लाख रुपये कमावले आहेत. धर्माटिक प्रोडक्शनच्या ‘आप जैसा कोई’ च्या शूटिंगमधून 8.12 लाख रुपयांची कमाई केली आहे.या दोनही फिल्मची शूटिंग मध्य रेल्वेच्या ‘आपटा’ रेल्वे स्टेशनवर झाली आहे. येथेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, मुन्ना मायकल आणि अन्य प्रसिद्ध चित्रपटाचे शूटिंग पार पडले आहे. नैसर्गिक सौंदर्य बरोबरच ‘आपटा’ रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचे सर्वात लोकप्रिय स्थानकांपैकी एक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आपटा रेल्वे स्थानकात एकुण 3 शूटिंग पार पडली आहेत. त्यामुळे 27.57 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. जे 2024-25 मध्ये फिल्म शूटिंगमधून मिळालेल्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे 68% आहे. अन्य लोकप्रिय स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कॉटन ग्रीन स्टेशन आणि माटुंगा रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 या चित्रपटाचे चित्रीकरण
* छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर नेटफ्लिक्स फिल्म खाकी आणि जाहीरात फिल्म टी-20 वर्ल्ड कप,
* कॉटन ग्रीन स्टेशनवर तेलुगु फिल्म कुबेर,
* आपटा स्टेशनवर वेब सीरीज चिल्ड्रन ऑफ फ्रीडम
* माटुंगा स्टेशनवर वेब सीरीज ‘दल दल’
मध्य रेल्वेवर अनेक बॉक्स ऑफिस हिट चित्रपटांची शूटिंग झाली आहे. यात स्लम डॉग मिलियनेयर, कमीने, रब ने बना दी जोड़ी, रा-वन, रावण, प्रेम रतन धन पायो, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है, दबंग, दरबार, रंग दे बसंती, बागी, खाकी, प्रेम रतन धन पायो आणि अन्य चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपट शुटींगसाठी सर्वात जास्त पनवेल जवळचे आपटा, आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसेच पनवेल, लोणावळा, खंडाला, वठार, सातारा आणि तुर्भे आणि वाडीबंदर सारख्या रेल्वे यार्डात शुटींग झाली आहेत.