बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात चौथ्या आरोपीचं नाव समोर, पुण्याशी खास कनेक्शन

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात चौथ्या आरोपीचं नाव समोर आले असून पोलीस त्याच्या शोधात आहे. या आरोपीचं पुण्याशी कनेक्शन देखील असल्याचं समोर आलंय. खून, दरोडा आणि हत्या असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मुंबई पोलिसांची एक टीम त्याला पकडण्यासाठी हरियाणाला गेली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात चौथ्या आरोपीचं नाव समोर, पुण्याशी खास कनेक्शन
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 6:58 PM

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी एका आरोपीचे नाव समोर आले आहे. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील शंकर गावात राहणारा आहे. मोहम्मद जसीन अख्तर असे त्याचे नाव आहे. या हत्या प्रकरणातील तो चौथा आरोपी आहे. डीएसपी सुखपाल सिंह यांनी खुलासा केला की, अख्तरवर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यामध्ये खून, दरोडा, हत्यारे चोरी करणे अशा गंभीर आरोपांचा समावेश आहे.

जसीन अख्तरवर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणांचे गांभीर्य लक्षात घेऊन पंजाबनंतर आता हरियाणा पोलिसांनी ही त्याच्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. जसीनला २०२२ मध्ये अटक करण्यात आली होती. जालंधर पोलिसांनी पहिल्यांदा त्याला अटक केली होती. पण सुटल्यानंतर तेव्हापासून तो आपल्या गावी परतलेलाच नाही. आता पोलीस अधिकाऱ्यांची चिंता वाढू शकते. कारण या हत्येच्या तपासात मुंबई पोलीस विशेष भूमिका बजावत असून त्यांनी यासंबंधीचे अनेक महत्त्वाचे क्लूसही गोळा केले आहेत.

मुंबई पोलिसांचे एक पथक जालंधरला गेले आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी तपास प्रक्रिया पुढे नेली. जसीन अख्तरच्या गुन्ह्यांची मुळे पंजाब आणि हरियाणामध्ये पसरलेली आहेत. त्याचे गुन्हेगारी नेटवर्क बरेच मोठे आहे.

पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीशीही संबंधित आहे. जसीनने विक्रम ब्रारच्या सांगण्यावरून पंजाबमधील दोन डेरा प्रेमींची रेकीही केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, जसीन अख्तर हा लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईच्या थेट संपर्कात होता आणि एका खास ॲपद्वारे त्याच्याशी संवाद साधत होता.

मोहम्मद जसीन अख्तर हा पुण्याचा गँगस्टर सौरभ महाकाल याच्याशीही संबंधित आहे. सौरभ महाकाळ हा पुण्यातील तोच गुंड आहे, ज्याची सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीची पत्रे पाठवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी केली होती. सौरभ महाकाल हा जसीनच्या घरी येऊन देखील थांबला होता.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांना १५ दिवसापूर्वीच धमकी आली होती. ज्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. पण तरी देखील त्यांची हत्या झाली. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुंबईत दहशतीचं वातावरण आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.