Namo Bharat Rail : भारताला मिळाली सर्वात वेगवान ट्रेन, पतंप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

| Updated on: Oct 20, 2023 | 3:51 PM

PM modi green flag to Namo bharat train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅपिडएक्स रेलला हिरवा झेंडा दाखवला आहे. त्यामुळे आजपासून देशाला सर्वात जलद रेल्वे मिळाली आहे. या ट्रेनमध्ये अशी कोणती हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत. या ट्रेनचा टॉप स्पीड किती आहे? जाणून घ्या.

Namo Bharat Rail : भारताला मिळाली सर्वात वेगवान ट्रेन, पतंप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा
Follow us on

Namo Rapid train : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॅपिडएक्स रेल नमो भारतला हिरवी झेंडा दाखवला आहे. ही रेल्वे अधिक सुरक्षित आणि हायटेक करण्यात आली आहे. रॅपिडेक्स रेलमध्ये वापरलेले तंत्रज्ञान अगदी वेगळे आहे आणि ट्रेनमध्ये दिलेली हायटेक वैशिष्ट्ये ही वेगळी आहेत. रिपोर्ट्सनुसार, RapidX ट्रेन कोणत्याही अपघातापूर्वी ड्रायव्हरला अलर्ट करेल आणि या ट्रेनमध्ये बसवलेले सेन्सर्स ऑटोमॅटिक असणार आहेत.

ही ट्रेन पूर्णपणे स्वयंचलित आहे पण त्याचबरोबर या ट्रेनच्या प्रत्येक बोगीमध्ये आपत्कालीन बटण देखील देण्यात आले आहे. कोणीही हे बटण दाबताच सेन्सर्स कार्यान्वित होतील. चुकून कोणी बटन दाबले तर ट्रेन थांबणार नाही पण ड्रायव्हरला खरी अडचण आहे असे वाटले तर ट्रेन थांबवली जाईल. मेट्रो आणि रॅपिडएक्स रेलमध्‍ये तुम्‍हाला दिसणारा सर्वात मोठा फरक वेग हा आहे.

मेट्रो विरुद्ध रॅपिडएक्सचा वेग?

दिल्ली मेट्रोच्या विमानतळ मार्गावर, मेट्रोचा वेग 120kmph आहे, तर RapidX ट्रेनचा वेग 160kmph पर्यंत जातो. रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण मार्गावर स्पीड मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे, एवढेच नाही तर ट्रेनमध्ये ऑटो पॅनल आणि वॉर्निंग सिस्टिमही बसवण्यात आल्या आहेत.

तिकीटही हायटेक

मेट्रो प्रमाणे, नमो भारत मध्ये प्रवासासाठी उपलब्ध तिकिटे देखील QR कोड आधारित असतील जी तुम्ही RAPIDEX Connect द्वारे खरेदी करू शकाल. केवळ ट्रेनच नाही तर स्टेशन देखील हायटेक वैशिष्ट्यांनी भरलेले आहे, प्रवेश आणि बाहेर पडताना QR कोड तिकीट स्कॅन करण्यासाठी स्कॅनर स्थापित केले आहेत.

सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा वापर

प्रत्येक बोगीमध्ये क्लोज सर्किट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ट्रेनमध्ये दिलेली मॉनिटरिंग सिस्टीम ड्रायव्हरला ट्रेनमधील प्रवासी लोडची माहिती देखील देईल, ड्रायव्हरला कमांडद्वारे याबद्दल अहवाल देखील मिळेल.