MSP चं काय होणार, नरेंद्र मोदी राज्यसभेत काय म्हणाले? शेतकऱ्यांना काय केलं आवाहन?

नरेंद्र मोदींनी किमान आधारभूत किमंत होती आहे आणि राहील, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. Narendra Modi on MSP

MSP चं काय होणार, नरेंद्र मोदी राज्यसभेत काय म्हणाले? शेतकऱ्यांना काय केलं आवाहन?
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 12:26 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Parliament Speech) राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. यावेळी त्यांनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि शेतीमधील सुधारणा यावर भाष्य केलं. नव्या कृषी कायद्यांविषयी बोलताना नरेंद्र मोदींनी 2014 पासून शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांचा पाढा वाचला. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात छोट्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भर दिला आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं तर MSP होता, आहे आणि राहील, अशी ग्वाही नरेंद्र मोदींनी दिली आहे. (Narendra Modi assures farmers MSP will continue in Rajya Sabha speech on President Ramnath Kovind Address )

किमान आधारभूत किमंतीवर नरेंद्र मोदी काय म्हणाले?

आम्ही, कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर शेतकरी आंदोलकांच्या संपर्कात आहोत, त्यांच्याशी चर्चा सुरु आहेत. मिळून मिसळून चर्चा करु, वृद्ध शेतकऱ्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचू नये. असं मोदी म्हणाले. आज मी संसदेतूनही आवाहन करतो, चर्चेने मार्ग काढू, तुम्हाला लोकशाहीत आंदोलनाचा हक्क आहे, आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं आहे, मागे नाही. पक्ष-विपक्ष असो, या सुधारणांना आपण संधी द्यायला हवी, या परिवर्तनाने लाभ होतो की नाही हे पाहावं लागेल, काही कमतरता असेल तर त्यात सुधारणा करु, आपण काही दरवाजे बंद करत नाहीत. मंडई अधिक प्रतिस्पर्धी होतील, लाभ होईल, MSP होता, आहे आणि राहील. या सभागृहाच्या पवित्र्यातून आम्ही ही ग्वाही देतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदींनी वाचला योजनांचा पाढा

2014 नंतर काही परिवर्तन केले, पीक विमा योजना वाढवली, जेणेकरुन छोटे शेतकरी त्याचा फायदा घेऊ शकतील, गेल्या चार -पाच वर्षात पीक विमा योजनेअंतर्गत 90 हजार कोटी रुपयांचा क्लेम शेतकऱ्यांना मिळाला. ही रक्कम कर्जमाफीपेक्षा मोठी होते, असं नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पाठवली. दहा कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. बंगालचे शेतकरी जर यात जोडले गेले असते तर हा आकडा मोठा असता. आतापर्यंत 1 लाख 15 हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले असल्याचं नरेंद्र मोदींनी सांगतिलं. 10 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ दिला. बंगालचं राजकारण आडवं आलं नसतं तर हा आकडा मोठा असता, छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली, आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली, याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना झाल्याचा दावा मोदींनी केला.

मोदी है मौका लिजिए

तुमच्या मनात कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे राग असेल, तो माझ्यावर काढला, त्यामुळे तुमचं मन हलकं झालं, माझ्यामुळे तुम्हाला आनंद मिळत असेल, जर मी त्यासाठी कामी आलो तर ते ही माझं सौभाग्य आहे, हा आनंद घ्या, चर्चा करा, मोदी आहे मौका मिळत असेल तर घ्या, मोदी है मौका लिजिएस, असं मोदी म्हणाले.

2047 साठी देश तयार होत आहे: मोदी

“मी एकटा नाहीं, मी एकटा नाही. मी माझ्यासोबत करोडो लोकांना पाहतो, त्यामुळे माझ्यात करोडो लोकांची शक्ती आहे, करोडो लोकांची दृष्टी आहे, कर्मशक्तीही आहे”, वेदांतील या विचाराने भारत 130 कोटी देशवासियांसोबत प्रगती करत आहे, 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्यांचं शतक गाठेल तेव्हासाठी भारत तयार होत आहे, असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या :

श्रमजीवी, बुद्धिजीवी ऐकले होते, आता आंदोलनजीवी अशी नवी जमात आलीय: मोदी

शरद पवार सुधारणांच्या बाजूनं, राजकारणासाठी काहींचा यूटर्न; मोदींचा टोला

PM Narendra Modi full speech highlights : शेतकरी आंदोलन, शरद पवार ते मनमोहन सिंह, मोदींचं संपूर्ण भाषण

(Narendra Modi assures farmers MSP will continue in Rajya Sabha speech on President Ramnath Kovind Address )

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.