AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : पंतप्रधानांना शोधण्यासाठी बंगालला जावं काय? काँग्रेस नेत्याने प्रश्न विचारताच मोदी लोकसभेत हजर!

काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला आणि तेवढ्यात नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत आगमन झालं. मोदींच्या आगमनानंतर भाजपच्या खासदारांनी भारत माता की जयच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं.

Narendra Modi : पंतप्रधानांना शोधण्यासाठी बंगालला जावं काय? काँग्रेस नेत्याने प्रश्न विचारताच मोदी लोकसभेत हजर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील भाषण
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 5:20 PM

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एक अनोखी घटना घडली. संसदेचं कामकाज संपण्यापूर्वी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला आणि तेवढ्यात नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत आगमन झालं. मोदींच्या आगमनानंतर भाजपच्या खासदारांनी भारत माता की जयच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडलं. लोकसभेत आज नेमकं काय झालं? जाणून घेऊया.(Ravneet Singh’s question about PM Modi’s absence, modi reached quickly in loksabha)

पंतप्रधान मोदी कुठे आहेत?

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. त्यामुळे लोकसभेत काँग्रेसचे नेते रवनीत सिंह बिट्टू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशनात अनेक मुद्दे आणि प्रश्नांवर चर्चा झाली, विधेयकं पारित झाली. पण गरीबांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या इंधन दरवाढीबाबत आणि घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीबाबत चर्चा झाली नाही. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता शेवटच्या टप्प्यात आहे. अशावेळी आम्ही पंतप्रधानांना भेटण्यासाठी कुठे जावं? पंतप्रधान कुठे आहेत, आम्ही त्यांना बंगालमधील प्रचार रॅलीत जाऊन भेटावं काय? असा खोचक सवाल रवनीत सिंह यांनी विचारला.

‘पंतप्रधान सर्वांसाठी उपलब्ध’

त्यावर सत्ताधारी भाजपकडून अर्जुनराम मेघावाल यांनी तीव्र विरोध केला. हे चुकीचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतही आले आहेत आणि ते लोकांना भेटण्यासाठी कायम तयार असतात, असं मेघावाल म्हणाले.

पंतप्रधान मोदींचं अचानक आगमन

लोकसभेत रवनीत सिंह आणि अर्जुनराम मेघावाल यांच्यात पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवरुन वादविवाद सुरु होता. त्यावेळी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेत आगमन झालं. पंतप्रधान सभागृहात पोहोचताच भाजपच्या खासदारांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.

राहुल गांधींचीही उपस्थिती

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस खासदार राहुल गांधीही लोकसभेत पोहोचले. कामकाजाच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लवकर कोरोनामुक्त होवोत अशी प्रार्थना केली. पीठासीन अधिकाऱ्यांनी ओम बिर्ला यांची प्रकृती स्थित असल्याची माहिती यावेळी दिली.

निवडणूक प्रचाराची रणधुमाळी

देशात सध्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. खासकडून पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकीवर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. पश्चिम बंगालमधील सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं जोर लावल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपचे अनेक प्रमुख नेते प. बंगालमध्ये प्रचारात उतरले आहेत. आसाममध्येही पंतप्रधानांची रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही केरळ, तामिळनाडू या राज्यात प्रचार करताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

आरएसएसला ‘संघ परिवार’ म्हणणार नाही; राहुल गांधींनी दिलं ‘हे’ कारण!

West Bengal Assam Election Opinion Poll:पश्चिम बंगाल, आसाममध्ये कोण बाजी मारणार? सर्वात मोठा ओपिनियन पोल टीव्ही 9 नेटवर्कवर

Ravneet Singh’s question about PM Modi’s absence, modi reached quickly in loksabha

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.