Narendra Modi: भ्रष्टाचारात सजा झाली तरी सगळीकडे उदोउदो कसा? गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते मोदींच्या टार्गेटवर

आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. संविधान दिनाचे महत्त्व, लोकशाहीची बलस्थाने यांचे महत्त्व सांगतानाच आजच्या लोकशाहीला कशापासून धोके आहेत, याबद्दलही पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली.

Narendra Modi: भ्रष्टाचारात सजा झाली तरी सगळीकडे उदोउदो कसा? गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते मोदींच्या टार्गेटवर
संविधान दिनानिमित्त भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 1:44 PM

नवी दिल्लीः आज संविधान दिनानिमित्त ( Constitution Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय लोकशाही, संविधान आणि देशातील सद्य राजकीय स्थितीवर भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या किंबहुना भ्रष्टाचारी म्हणून सिद्ध झालेल्या नेत्यांचा कशा प्रकारे उदो उदो सुरु आहे, या विषयी चिंता व्यक्त केली. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याची स्पर्धा लागली आहे, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला. लोकशाहीच्या हितासाठी काम करणाऱ्यांनी याबाबत जागरूकता निर्माण करावी, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी त्यांनी केलं.

भ्रष्टाचारी नेत्यांविषयी काय म्हणाले पंतप्रधान?

संविधान दिनानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी देशात सक्षम अशी न्यायव्यवस्था आहे. पण याच न्यायव्यवस्थेने एखाद्या नेत्याला भ्रष्टाचारी घोषित केलेले असेल, एखाद्याला शिक्षा दिलेली असेल तरीही आज केवळ राजकीय स्वार्थापोटी त्या नेत्यालाही मोठेपण दिले जात आहे. राजकीय लालसेपोटी त्यांचे महिमामंडन केले जात आहे. त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाल्यानंतरही लोकलज्जा सोडून त्यांना जाहीर कार्यक्रमात बोलावलं जातं. अशा नेत्यांची पुन्हा एकदा मोठ्या व्यासपीठांवर ऊठ-बस सुरु होते. देशातील नवीन पिढी यातून काय बोध घेईल? भ्रष्टाचारात बरबटलेल्या लोकांची पुन्हा एकदा प्रतिष्ठा वाढवली जात असेल तर आपण कितीही भ्रष्टाचार केला तरी दोन-चार वर्षात लोक ते विसरतात, पुन्हा त्या नेत्याला स्वीकारतात, अशीच लोकभावना होईल. गुन्हा सिद्ध झाला असेल तर संबंधित नेत्याला सुधारण्यासाठी अवश्य संधी मिळावी. पण सार्वजनिक जीवनात अशा व्यक्तींना प्रतिष्ठा देण्याची जी स्पर्धा लागली आहे, ती लोकशाहीसाठी अधिक घातक असल्याची खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली.

‘पार्टी फॉर द फॅमिली’ वर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय परिवारांत चाललेल्या कौटुंबिक पार्ट्यांवरही यावेळी भाष्य केले. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या या संकटामुळे संविधानाच्या मुख्य प्रतिमेला या मुळे धोका निर्माण झाला आहे, नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती एका पक्षात असणे गैर नाही. मात्र एकच राजकीय पक्ष पिढ्यान् पिढ्या एकाच कुटुंबाच्या सत्तेत असणे हा चिंतेचा विषय असल्याचे मत मोदी यांनीन यावेळी व्यक्त केले. लोकशाहीसाठी हे अधिक घातक ठरू शकते, असे ते म्हणाले.

इतर बातम्या-

महाराष्ट्रातल्या मराठी उद्योगपतीच्या घरातला वाद कसा मिटणार? किर्लोस्करांना सुप्रीम कोर्टानं मार्ग दाखवला

Pm modi : संविधान दिवसाच्या पंतप्रधानांकडून देशवासियांना शुभेच्छा, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री म्हणाले…

मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.