Birth Certificate | जन्म आणि मृत्यू दाखला आता ‘असा’ही मिळणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र संशोधन विधेयक आज लोकसभेत पास झाले आहे. याचा देशातील सर्व नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

Birth Certificate | जन्म आणि मृत्यू दाखला आता 'असा'ही मिळणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय
Prime Minister Narendra Modi
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 12:07 AM

नवी दिल्वी | 5 ऑगस्ट 2023 : लोकसभेत आज एक महत्त्वाचे बिल पास झाले आहे. ज्यामुळे आता नागरिकांच्या सरकारी कार्यालयाच्या खेपा कमी होणार आहेत. या विधेयकामुळे आता डिजीटल जन्म आणि मृत्यू दाखल मिळणार आहे. शाळेत नाव नोंदणी पासून अनेक सरकारी कामात जन्मदाखला लागतो. आता याचे डिजीटलायझेशन झाल्याने हे डिजिटल प्रमाणपत्र भविष्यात खूप उपयुक्त ठरणार आहे. यामुळे अनेक कागदपत्रांची गरज कमी होईल.

मुलाचा जन्म दाखला पालकांच्या आधार कार्ड तपशीलाशी जोडला जाणार असल्याचं देखील या प्रस्तावात म्हटले आहे. हा डेटा रुग्णालयांसह जवळपास सर्व सरकारी विभागांकडे उपलब्ध असेल, ज्याचा वापर ते गरज पडल्यास करू शकतील.

जन्म आणि मृत्यूच्या नोंदी व्यवस्थापित करण्यासाठी सरकार डेटा बेस तयार करेल. यासाठी स्वतंत्र टीम तयार केली जाईल, जी त्याचे व्यवस्थापन पाहेल. ही केंद्रीय टीम राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर, रेशनकार्ड आणि मालमत्ता नोंदणीचा ​​डेटाही अपडेट करेल. राज्ये केंद्रीय नागरी नोंदणी प्रणाली पोर्टलवर जन्म आणि मृत्यूची नोंदणी करतील आणि भारताच्या रजिस्ट्रार जनरलसोबत डेटा सामायिक करतील, असा प्रस्तावही या विधेयकात आहे. ते अनिवार्य करण्याचा प्रस्तावही विधेयकात ठेवण्यात आला आहे.

केंद्रीय डेटाबेसमधून माहितीचे विश्वसनीय केंद्र असेल, त्यामुळे कामही सोपे होईल, असा विश्वास केंद्र सरकारला आहे. प्रशासकीय कार्यक्षमतेतही वाढ अपेक्षित आहे. सिंगल डिजीटल जन्म प्रमाणपत्र हे शालेय प्रवेश, पासपोर्ट, सरकारी नोकरी इत्यादींसाठी उपयुक्त दस्तऐवज सिद्ध होईल. त्याची पडताळणीही खूप सोपी होईल. नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी हा प्रयत्न उपयुक्त ठरेल, असा दावा केला जात आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.