ओबीसी आणि आदिवासींचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून उल्लेख; नेमकं काय म्हणाले?

"प्रत्येक वंचितला वाटतं आपणच जिंकलोय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं ही निवडणूक शेतकरी जिंकले आहेत. आज आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतंय", असं नरेंद्र मोदी म्हणाले.

ओबीसी आणि आदिवासींचा पंतप्रधान मोदी यांच्याकडून उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 8:08 PM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाषण केलं. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात ओबीसी आणि आदिवासी यांचा उल्लेख केला. “मी वारंवार सांगत आहे. माझ्यासाठी देशात चार जातीच सर्वात मोठ्या जाती आहेत. नारीशक्ती, युवा शक्ती , शेतकरी आणि गरीब कुटुंब या चारच जाती आहेत. आपले ओबीसी साथी याच वर्गातून येतात. आज मोठ्या संख्येने आदिवासी लोक याच वर्गातून येतात. या निवडणुकीत चारही जातींनी भाजपच्या योजना आणि रोडमॅपवर उत्साह दाखवला आहे. आज प्रत्येक गरीब म्हणतोय, तो स्वत: जिंकला आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“प्रत्येक वंचितला वाटतं आपणच जिंकलोय. प्रत्येक शेतकऱ्यांना वाटतं ही निवडणूक शेतकरी जिंकले आहेत. आज आदिवासींना वाटतं आपण ज्याला मत दिलं त्यांचा विजय झाला. प्रथम मतदारांनाही आपल्यामुळेच विजय झाल्याचं वाटतं. प्रत्येक महिललेला आपणच विजयी झाल्याचं वाटतं. प्रत्येक नागरिक हे आपलं यश मानतो. जो २०४७ भारताला विकसित राष्ट्र पाहू इच्छितो”, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.

‘देशातील नारी शक्तीचं अभिनंदन करतो’

“मी देशातील नारी शक्तीचं अभिनंदन करतो. रॅलीत मी सातत्याने सांगायचो. या निवडणुकीत महिला शक्ती भाजपला विजयी करणार असल्याचा निश्चय केल्याचं सांगायचो. देशातील नारी शक्ती जेव्हा ज्याचं सुरक्षा कवच बनते, तेव्हा कोणतीही ताकद त्यांना रोखू शकत नाही. नारीशक्ती वंदन अधिनियमाने महिलांच्या मनात नवा विश्वास जागवला आहे. देशातील प्रत्येक महिलेच्या मनात भरवसा निर्माण झाला आहे. भाजप सरकारमध्ये त्याची भागिदारी उंचवणार आहे, असं या महिलांना वाटतं. भाजपच महिलांचा सन्मान करू शकते असं प्रत्येक कन्येला वाटतं”, असं मोदी म्हणाले.

“गेल्या दहा वर्षात भाजपने त्यांच्यापर्यंत टॉयलेट, वीज, गॅस, पाणी, बँकेत खाती अशा सुविधा दिल्या. इमानदारीने काम केलं. भाजप कुटुंब, समाजात त्यांची आर्थिक भागीदारी वाढवण्यासाठी रोजगाराच्या संधी वाडवण्यासाठी निरंतर काम करत आहे, हे महिला पाहत आहे. नारी शक्तीचा विकास हा भाजपच्या विकास मॉडेलचा स्तंभ आहे. म्हणूनच या निवडणुकीत महिलांनी भाजपाच्या विजयाची जबाबदारी आपल्या हातात घेतली होती. आपल्याला भरपूर आशीर्वाद दिला. मी नम्रपणे देशातील महिलांना हेच सांगेल की तुम्हाला जी आश्वासनं दिली ती शत प्रतिशत पूर्ण करू. ही मोदींची गॅरंटी आहे. आणि मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची गॅरंटी”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.