Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi on Sharad Pawar : या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा पवारांवर खोचक हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही9 ला महामुलाखत दिली. त्यात त्यांनी देशातील अनेक मुद्यांसह महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केले. या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक हल्ला त्यांनी शरद पवारांवर केला.

PM Modi on Sharad Pawar : या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार, मोदींचा पवारांवर खोचक हल्ला
शरद पवार यांच्यावर पुन्हा हल्लाबोल
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 11:27 PM

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील राजकारणाला अनन्यसाधारण महत्व आले आहे. महाविकास आघाडीविरोधात महायुती असा सामना रंगला असे दिसत असले तरी भाजपचा अख्खा दारुगोळा पवारांवर खर्ची पडताना दिसत आहे. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क टीव्ही 9 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली. या महामुलाखतीत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. या वयात कुटुंब सांभाळू शकत नाही, महाराष्ट्र काय सांभाळणार असा खोचक हल्ला त्यांनी केला.

सिंपथी कसली संतापाचं वातावरण

“शरद राव यांच्याबाबत बोलायचं म्हणजे ही राजकीय समस्या नाही. त्यांनी हा कितीही राजकीय मुद्दा बनवला तरी महाराष्ट्रातील जनतेला कसं पटेल? हा त्यांचा कौटुंबीक प्रॉब्लेम आहे. घरातील झगडा आहे. वारसा काम करणाऱ्या मुलाला द्यायचा की मुलगी आहे तर मुलीला द्यायचा? झगडा त्याचा आहे. सिंपथीऐवजी संतापाचं वातावरण आहे की या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाहीत. ते महाराष्ट्राला काय सांभाळतील? असा हल्लाबोल पंतप्रधानांनी त्यांच्यावर केला. सर्व इमोशन आमच्या बाजूने आहेत असा विश्वास पण मोदींनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

भटकती आत्मा म्हणून टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच राज्याचा दौरा केला. ते राज्यात जणू तळ ठोकूनच होते. त्यावेळी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक सभांमधून शरद पवार यांच्यावर टीका करताना भटकती आत्मा म्हणून टीका केली. भुताटकी, भटकती आत्मा या नवीन शब्दांची भर मोदींनी राजकीय डिक्शनरीत घातली. त्यानंतर राज्याचे वातावरण ढवळून निघाले. विरोधकांनी पण मोदींवर सडकून टीका केली.

मतदार आमच्यासोबत

मलाही वाटतंय यावेळी ही इमोशनल परिस्थिती भाजपच्या बाजूने आहे. युतीच्या बाजूने आहे. कारण बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आमच्यासोबत आहे. अधिकृत राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. त्यामुळे लोकांना वाटतंय की कुटुंबाच्या सत्तेच्या हव्यासापायी बाळासाहेबांचं स्वप्न यांनी का मोडलं. कुटुंबाच्या भल्यासाठी? आपल्या मुलाला इस्टॅब्लिश करण्यासाठी? बाळासाहेबांचा एवढा मोठा वारसा. बाळासाहेबांनी शिवसैनिकांसाठी जीवन अर्पण केलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांच्या सन्मानासाठी जी शिवसेना काम करत आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, ती आज आमच्यासोबत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदार आमच्यासोबत भावनने जोडलेला गेला आहे,असा दावा पंतप्रधानांनी केला.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.