PM Modi: नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन 11व्या तर इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन 20 व्या क्रमांकावर
पंतप्रधान मोदी यांचे अप्रूव्हल रेटिंग मे 2020 मध्ये सर्वाधिक 84 टक्के होते. त्यावेळी भारत कोरोना महामारीतून बाहेर प़डत होता. या वर्षी जूनमध्ये जारी करण्यात आलेल्या अप्रूव्हर रेटिंगच्या तुलनेत यावेळी मोदी यांचे रेटिंग सुधारलेले आहे.
न्यूयॉर्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून निवडून आलेले आहेत. अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंट फर्म द मॉर्निंग कन्सल्टच्या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रूव्हल रेटिंगमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, (Jo Biden)ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एन्थोनी अल्बेनेस यांच्यासह जगातील 22 देशांच्या नेत्यांना मागे सोडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रूव्हल रेटिंग हे 75 टक्के इतके आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे 41 टक्के रेटिंगसह 11 व्या स्थानी आहेत. या रिपोर्टनुसार दुसऱ्या नंबरवर मेक्सिकोचे (Mexico)राष्ट्रपती आंद्रेस मेनुएल लोपेज ओब्रोडोर आहेत. त्यांना 63 टक्के जणांनी वोटिंग केलेले आहे. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एँथोनी अल्बेनेस राहिले. त्यांना 58 टक्के जणांनी पसंती दिली. हा सर्वे या वर्षी 17 ऑगस्ट ते 23 ऑगस्टच्या काळात करण्यात आला.
Visionary PM @narendramodi ji is a global leader with the top position among world’s most popular leaders. Modi ji got an approval rating of 75% in Morning Consult survey.
हे सुद्धा वाचाModi ji’s mantra “Reform, Perform, Transform” for Governance has made him the most loved leader. pic.twitter.com/CaBQs7KLJL
— RajyavardhanRathore (@Ra_THORe) August 26, 2022
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घसरली होती लोकप्रियता
द मॉर्निंग कन्सल्ट सर्व्हेनुसार, भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात मे 2021 साली पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंग (लोकप्रियतेतील घट) ही सर्वाधिक होती. त्यावेळी कोरोनाच्या कारणांमुळे हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनची कमतरता होती आणि देशावर त्याचा वाईट परिणाम झालेला होता. मात्र त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने या अवघड स्थितीवर तोडगा काढण्यात यश मिळवले होते.
मे 2020 मध्ये मोदींना सर्वाधिक 84 टक्के होते अप्रूव्हल रेटिंग
पंतप्रधान मोदी यांचे अप्रूव्हल रेटिंग मे 2020 मध्ये सर्वाधिक 84 टक्के होते. त्यावेळी भारत कोरोना महामारीतून बाहेर प़डत होता. या वर्षी जूनमध्ये जारी करण्यात आलेल्या अप्रूव्हर रेटिंगच्या तुलनेत यावेळी मोदी यांचे रेटिंग सुधारलेले आहे. जूनमध्ये पंतप्रधानांचे अप्रूव्हल रेटिंग हे 66 टक्के होते. तसेच मोदी यांचा डिसअप्रूव्हल रेटिंगमध्ये घटही झालेली आहे. सुमारे 25 टक्के घट झाल्यामुळे ते या यादीत सर्वात खालच्या स्थानावर आहेत.
कशी ठरते डिसअप्रूव्हल रेटिंग
द मॉर्निंग कन्सल्ट अप्रूव्हल आणि डिसअप्रूव्हल रेटिंग 7 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजवर आधारित असते. या गणितात 1 ते 3 टक्के प्लस-मायनस मार्जिन असते. म्हणजे यात 1 ते 3 टक्क्यांनी घट किंवा वाढ होऊ शकते. हे आकडे तयार करण्यासाठी मॉर्निंग कन्सल्टमध्ये भारताच्या सुमारे 2126 लोकांचा ऑनलाईन इंटरव्ह्यू घेतला होता.