संघापासून पंतप्रधानपदापर्यंत; मोदींचा राजकीय प्रवास कसा झाला माहीत आहे काय?

मोदींनी संघटनेत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यामुळेच त्यांच्याकडे गुजरातची जबाबदारी आली. गुजरातचे चारवेळा मुख्यमंत्री झाले. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही घोषित झाले.

संघापासून पंतप्रधानपदापर्यंत; मोदींचा राजकीय प्रवास कसा झाला माहीत आहे काय?
संघापासून पंतप्रधानपदापर्यंत; मोदींचा राजकीय प्रवास कसा झाला माहीत आहे काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 17, 2022 | 3:51 PM

नवी दिल्ली: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रांत प्रचारक लक्ष्मणराव इनामदार हे 1958मध्ये गुजरातच्या वडनगरला पोहोचले. त्यानिमित्ताने संघाची विशेष सभा बोलावण्यात आली. इनामदार हे वडनगरमधील बाल स्वयंसेवकांना निष्ठेची प्रतिज्ञा देणार होते. शपथ देण्याची ही प्रक्रिया सुरू झाली आणि एका आठवर्षाच्या मुलापर्यंत येऊन ठेपली. त्या मुलाचं नाव होतं नरेंद्र दामोदरदास मोदी (narendra modi). मोदींचं हे संघातलं पहिलच वर्ष होतं. मोदींचे वडील दामोदरदास मोदी (damodardas modi) त्यावेळी वडनगरच्या रेल्वे स्टेशनमध्ये चहा विकण्याचं काम करत होते. लहानगा नरेंद्र सकाळी वडिलांना मदत करायचा अन् शाळेची वेळ होताच आपली झोळी काखेत मारून शाळेत जायचा. चहा विकणारा नरेंद्र, वयाच्या आठव्या वर्षी संघाच्या शाखेत जाणारा नरेंद्र नंतर गुजरातचा मुख्यमंत्री होईल, पुढे देशाचा पंतप्रधान होईल असं कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पण मोदींनी ते करू दाखवलं.

कुटुंबीयांनी अत्यंत कमी वयात नरेंद्र मोदी यांचं लग्न लावून दिलं होतं. ते 18 वर्षाचे असतानाच त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. त्यामुळे मोदी घर सोडून पळून गेले होते. कारवाँ नावाच्या मॅगझिनने मोदींचे बंधू सोमा मोदी यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. नरेंद्र कुठे गेला याची कुटुंबीयांना काहीच माहिती नव्हती. दोन वर्षानंतर तो अचानक घरी आला. माझा संन्यास संपला असं तो म्हणाला. मी आता अहमदाबादला जात आहे. तिथे काकांच्या कँटिनमध्ये काम करणार आहे, असं त्याने घरच्यांना सांगितल्याचं सोमा मोदी सांगतात.

अहमदाबादला आल्यावर मोदींनी काही काळ काकांच्या कँटिनमध्ये काम केलं. त्यानंतर स्वत:चं चहाचं दुकान उघडलं. अहमदाबादच्या गीता मंदिर येथे त्यांनी ठेला लावला होता. या मंदिराच्या गल्लीतूनच स्वयंसेवकांची ये-जा सुरू असायची. मोदीही स्वयंसेवक होते. त्यामुळे त्यांचं इतर स्वयंसेवकांशी चांगलं जमायचं. काही काळानंतर लक्ष्मणराव इनामदार यांना मोदींची माहिती मिळाली. इनामदार यांनी मोदींना संघाच्या केशव भवन या मुख्यालयात येऊन राहण्याचा सल्ला दिला.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर मोदी केशव भवनमध्ये राहू लागले. केशव भवनची देखरेख करतानाच सर्वांसाठी ते नाश्ताही करायचे. केशव भवनची साफसफाई आणि इतर कार्यालयांची साफसफाई करण्याचं कामही ते करत होते.

याच केशव भवनमध्ये त्यांनी संघटना बांधणीचे धडे गिरवले. त्याकाळात देशात आणीबाणी लागली होती. आणीबाणीच्या काळात अंडरग्राऊंड झालेल्या कार्यकर्त्यांना प्रचाराचं साहित्य पोहोचवण्याची जबाबदारी मोदींवर होती. त्यांनी हे काम अत्यंत निष्ठेने केलं. आणीबाणी संपल्यानंतर संघाने मोदींवर अजून जबाबदाऱ्या दिल्या. त्यांना संघ आणि इतर संघटनांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे मोदींचा पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश झाला.

मोदींनी संघटनेत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यामुळेच त्यांच्याकडे गुजरातची जबाबदारी आली. गुजरातचे चारवेळा मुख्यमंत्री झाले. पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणूनही घोषित झाले. त्यांनी 2014मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली. याच निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आणि केंद्रात संपूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केलं. मोदी पंतप्रधान झाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही मोदींचा हा करिष्मा कायम राहिला. ते सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले. एक साधा स्वयंसेवक ते मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ते सध्या देशाचे सर्वोच्च नेते आहेत.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.