PM Modi Mann ki Baat Live : 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना देशानं समर्थपणे केला: नरेंद्र मोदी

| Updated on: Dec 26, 2021 | 1:08 PM

Narendra Modi Mann ki baat live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी 11 वाजता 'मन की बात' मधून देशाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा हा 84 वा भाग होता.

PM Modi Mann ki Baat Live : 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना देशानं समर्थपणे केला: नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी (Credit : Twitter Narendra Modi)

PM Modi Mann ki Baat नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा 84 वा भाग होता. 2021 या वर्षातील ही शेवटची मन की बात होती.   नरेंद्र मोदी यांची मन की बात दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित केली जाते.

नरेंद्र मोदींचं ट्विट

2014 ला पासून मन की बात सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाची सुरुवात 3 ऑक्टोबर 2014 रोजी प्रसारित झाली होती. नरेंद्र मोदी मन की बातमध्ये विषय मांडण्यासाठी सूचना मागवून घेतात. आतापर्यंत मन की बातचे 83 भाग प्रसारित झाले आहेत. नरेंद्र मोदी यांची आज प्रसारित होणारी मन की बात या वर्षातील शेवटची असेल. मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी अनेक मुद्द्यांवर बोलतात.

आजच्या मन की बातमध्ये काय?

नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरण, कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्रानं केलेले प्रयत्न आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना विशेष आवाहन केलं. आपण  भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपण जगातील गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा आपण समर्थपणे सामना केला आहे. देशानं 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. कोरोनाचा नवा वेरियंट आला आहे. ओमिक्रॉनचा नवा वेरियंट आला असल्यानं आपल्याला जबाबदारीनं वागावं लागेल. ओमिक्रॉनच्या संसर्गाला रोखण्याच्या निश्चयासह आपल्याला 2022 मध्ये प्रवेश करायचा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेल्या 14 जणांना आदरांजली केली. वरुण सिंग यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संवादामध्ये केली. कॅप्टन वरुण सिंग यांनी लिहिलेलं पत्र प्रत्येक भारतीयाला, भारतातील प्रत्येक नागरिकाला, विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल. दरवर्षी मी परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. यावर्षी देखील संवाद साधण्यासाठी 28 डिसेंबर ते 20 जानेवारी दरम्यान नोंदणी करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केली.

इतर बातम्या:

मोठी बातमी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अचानक देशाला संबोधन, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर 3 मोठ्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला संबोधन, काय म्हणाले मोदी? वाचा सविस्तर

Narendra Modi Mann ki baat live address prime minister narendra modi address to nation live updates last episode of 2021 today

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Dec 2021 11:25 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भांडारकर संशोधन संस्थेचा मन की बातमध्ये उल्लेख

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भांडारकर संशोधन संस्थेचा मन की बातमध्ये उल्लेख

  • 26 Dec 2021 11:18 AM (IST)

    पुस्तक वाचन वाढवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल: नरेंद्र मोदी

    पुस्तक वाचन वाढवण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल: नरेंद्र मोदी

  • 26 Dec 2021 11:11 AM (IST)

    परीक्षा पे चर्चामध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन

    कॅप्टन वरुण सिंग यांनी प्रत्येक भारतीयाला, भारतातील प्रत्येक नागरिकाला, विद्यार्थ्यांना प्रेरणा देईल. दरवर्षी मी परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांशी संवाद साधतो. यावर्षी देखील संवाद साधण्यासाठी 28 डिसेंबर ते 20 जानेवारी दरम्यान नोंदणी करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केली.

  • 26 Dec 2021 11:08 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीडीएस बिपीन रावत आणि वरुण सिंग यांची आठवण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबरमध्ये झालेल्या सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्यासह हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेल्या 14 जणांना आदरांजली केली. वरुण सिंग यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संवादामध्ये केली.

  • 26 Dec 2021 11:07 AM (IST)

    नव्या वर्षात ओमिक्रॉनच्या संसर्गाला रोखण्याचा निश्चय करुया: नरेंद्र मोदी

    भारताचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आपण जगातील गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा आपण समर्थपणे सामना केला आहे. देशानं 100 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला. कोरोनाचा नवा वेरियंट आला आहे. ओमिक्रॉनचा नवा वेरियंट आला असल्यानं आपल्याला जबाबदारीनं वागावं लागेल. ओमिक्रॉनच्या संसर्गाला रोखण्याच्या निश्चयासह आपल्याला 2022 मध्ये प्रवेश करायचा आहे.

  • 26 Dec 2021 11:03 AM (IST)

    मन की बात मधून आमच्या सरकारच्या कामांचा उल्लेख करता आला असता: नरेंद्र मोदी

    माझ्या सर्व प्रिय देशवासियांना नमस्कार, तुम्ही 2021 वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असाल. प्रत्येक जण, संघटना नव्या वर्षात नवा संकल्प करत असतो. गेल्या 7 वर्षांपासून मन की बात सुरु आहे. मी 7 वर्षाच्या कालावधी माझ्या सरकारच्या कामाबद्दल बोलू शकतो. मात्र, माध्यमापासून दूर असलेले कोट्यवधी लोक देशाच्या भविष्यासाठी काम करत आहेत. मन की बात अशा लोकांच्या संकल्पना देशवासियापर्यंत पोहोचवण्यासाठी करत असतो.

  • 26 Dec 2021 10:45 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थोड्याच वेळात मन की बात

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ मधून देशाला संबोधित करतील. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा हा 84 वा भाग असेल. 2021 या वर्षातील ही शेवटची मन की बात असेल.

Published On - Dec 26,2021 9:09 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.