नितीश कुमार, चंद्रबाबू नायडूंचे दबावतंत्र: मोदींना नव्हे, तर नितीश कुमार यांना पंतप्रधान करा, थेट जेडीयूच्या नेत्याकडून…

Nitish Kumar and Chandrababu Naidu return as kingmakers: चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र सुरु आहे. दोन्ही गटांना लोकसभा अध्यक्षपद हवा आहे. वाजपेयी सरकारच्या काळात जशी घटक पक्षांना ताकद होती तशी ताकद देण्याची मागणी नितीश कुमार करण्याची शक्यता आहे.

नितीश कुमार, चंद्रबाबू नायडूंचे दबावतंत्र: मोदींना नव्हे, तर नितीश कुमार यांना पंतप्रधान करा, थेट जेडीयूच्या नेत्याकडून...
narendra modi, nitish kumar and chandrababu naidu
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 12:58 PM

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही. भाजपचा रथ २४१ जागावर थांबला. सतत दोन वेळा स्वबळाबर बहुमत मिळवणाऱ्या भाजपला आता सहयोगी पक्षांची साथ लागणार आहे. यामुळे नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्रबाबू नायडू यांच्यालुगू देशम पक्षाला महत्व आले आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वी या दोन्ही पक्षांकडून दबावतंत्र वापरले जात आहे. नितीश कुमार यांच्या मंत्र्याने सरळ पंतप्रधानपदाची मागणी केली आहे. नितीश कुमार यांना पंतप्रधान करण्याची मागणी मंत्री जमा खान यांनी केली आहे.

काय म्हणतात जमा खान

नितीश कुमार यांनी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी दबावतंत्र वाढवले आहे. नितीश कुमार सरकारमधील मंत्री जमा खान यांनी थेट पंतप्रधानपदी नितीश कुमार यांना बसवा, असे सांगितले आहे. त्यासंदर्भात एनडीएमधील सर्व पक्षांनी एकमताने निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. मंत्री जमा खान यांच्या मागणीने चर्चेला उधाण आले आहे.

चंद्रबाबू नायडूंना हवे पाच मंत्रीपद अन् लोकसभा अध्यक्षपद

एनडीएमध्ये भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून तेलगु देसम समोर आला आहे. यामुळे केंद्र सरकारमध्ये चंद्रबाबू नायडू यांचा महत्वाचा रोल राहणार आहे. त्यांनी आपल्या मागण्याची यादी तयार केली आहे. लोकसभा अध्यक्षपद आणि केंद्रात कमीत कमी पाच मंत्रीपदाची मागणी त्यांनी केली आहे. परंतु उपपंतप्रधानपदाची कोणतीही मागणी नसल्याचे टीडीपीने स्पष्ट केले आहे. जदयूकडे 12 तर टीडीपीकडे 16 खासदार आहेत. या दोन्ही पक्षांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न इंडिया आघाडीकडून केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

वाजपेयी सरकारप्रमाणे घटकपक्षांना हवा वाटा

चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचे एनडीए आघाडीवर दबाव तंत्र सुरु आहे. दोन्ही गटांना लोकसभा अध्यक्षपद हवा आहे. वाजपेयी सरकारच्या काळात जशी घटक पक्षांना ताकद होती तशी ताकद देण्याची मागणी नितीश कुमार करण्याची शक्यता आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.