Narendra Modi : नितीश कुमार यांचे मोदींच्या पायाला हात लावू दर्शन, मोदी झाले संविधानासमोर नतमस्तक; दोन चित्र ज्याची दिवसभर चर्चा

NDA Alliance Meeting LIVE : नरेंद्र मोदी यांची आज एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. तर दोन दिवसांत केंद्रात एनडीए सरकार येत आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीतील दोन घटनांनी देशाचे लक्ष वेधले. त्याची दिवसभर चर्चा होती.

Narendra Modi : नितीश कुमार यांचे मोदींच्या पायाला हात लावू दर्शन, मोदी झाले संविधानासमोर नतमस्तक; दोन चित्र ज्याची दिवसभर चर्चा
संविधानसमोर झाले नतमस्तक
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 2:58 PM

दिल्लीत आज राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी महत्वाचा दिवस होता. नरेंद्र मोदी यांची एनडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यावेळी एनडीएतील घटक पक्षातील नेत्यांनी त्याला अनुमोदन दिले. त्यावेळी अनेकांना त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी मोदींवर शब्द सुमनं उधळली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष नितीश कुमार यांनी आशिर्वादासाठी नरेंद्र मोदींचे पाय धरले. तर मोदी संविधानासमोर नतमस्तक झाले. या दोन घटनांची देशभर चर्चा झाली.

संसदेच्या पायऱ्यांवर टेकवले डोके

20 जून 2014 रोजी मोदी पंतप्रधान झाल्यावर संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले होते. भारतीय संस्कृतीचे दर्शन त्यांनी करुन दिले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला. संविधान बदलण्यासाठीच भाजपला बहुमताचा हा आकडा हवा, असा विरोधकांनी प्रचार केला. यावेळी भाजपला अनेक राज्यात फटका बसला. भाजपमुळे संविधान, घटना धोक्यात असल्याचा आरोप इंडिया आघाडीने अनेकदा केला. त्याचा परिणाम निकालातून दिसला.

हे सुद्धा वाचा

संविधानासमोर झाले नतमस्तक

मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा एकदा केंद्रात सत्ता स्थापन करत आहे. त्यापूर्वी दिल्लीत शुक्रवारी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली. मोदी संविधानासमोर नतमस्तक झाले. त्यांनी संविधानाची प्रत स्वतःच्या डोक्याला लावली. या कृतीमुळे उपस्थित सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांच्या या कृतीचे स्वागत केले.

नितीशबाबूंनी घेतले आशिर्वाद

तर बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष नितीश कुमार यांच्या कृतीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी घोषणा देत आशिर्वादासाठी नरेंद्र मोदी यांच्या पायाला स्पर्श केला. बिहारमधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पण नितीश कुमार यांनी अशीच कृती केली होती. त्यांनी चर्चा सुरु असताना मोदींचे पाय धरले होते. आज पुन्हा ते मोदींच्या पाया पडले. या घटनेमुळे विरोधी गटांच्या भुवया मात्र नक्की उंचावल्या असतील. तर आज दिवसभर या दोन घटनांवरच देशभर चर्चा होत आहे. एका कृतीतून मोदींनी संविधानाचे महत्व विषद केले तर दुसऱ्या कृतीतून नितीश कुमार यांनी एनडीए सोडून दुसरीकडे जाणार नसल्याचे दाखवून दिले.

Non Stop LIVE Update
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं..
'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेचे नाव चंद्रकांत पाटील यांनी असं घेतलं...
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर
'वेळ कशी कोणावर येते...,' क्लीन चिटवर काय म्हणाले रवींद्र वायकर.
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
आगे आगे देखो होता है क्या,, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा.
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका
कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाचे दहा उमेदवार ? कोणी केली टिका.
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.