Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यसभेत पवारांचा दाखला, मोदी म्हणाले ना खेळणार, ना खेळू देणार, मी तर खेळ बिघडवणार!

जिथे विरोधकांचं सरकार आहे, तिथे कृषी कायद्यांतील सुधारणांची अगोदरच अंमलबजावणी झाली आहे. आम्हाला प्रतिगामी नव्हे तर पुरोगामी राजकारण करायचे आहे, असे मोदींनी म्हटले. | PM Narendra Modi

राज्यसभेत पवारांचा दाखला, मोदी म्हणाले ना खेळणार, ना खेळू देणार, मी तर खेळ बिघडवणार!
शरद पवार यांनी एकदा बाजार समित्यांमधील सुधारणांविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या बचावासाठी एपीएमसीच्या बदलांना प्रमोट करण्यात येत आहे.
Follow us
| Updated on: Feb 10, 2021 | 5:56 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नावाची ढाल पुढे करताना दिसले. त्यांनी बुधवारी लोकसभेतील भाषणात शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कृषी क्षेत्रातील सुधारणांविषयीच्या पूर्वीच्या वक्तव्याचा उल्लेख केला. ( PM Narendra Modi speech in Loksabha)

शरद पवार यांनी एकदा बाजार समित्यांमधील सुधारणांविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा शरद पवार यांनी म्हटले होते की, शेतकऱ्यांच्या बचावासाठी एपीएमसीच्या बदलांना प्रमोट करण्यात येत आहे. कारण शेतकऱ्यांना एपीएमसी मंडयांचा पर्याय मिळेल, जेव्हा जास्त व्यापारी रजिस्टर होतील, तेव्हा स्पर्धा वाढेल आणि मंडईतील साटंलोटं बंद होईल, असं पवार म्हणाले होते.

त्यामुळे आपल्याला या बाबी समजून घ्याव्या लागतील. जिथे विरोधकांचं सरकार आहे, तिथे कृषी कायद्यांतील सुधारणांची अगोदरच अंमलबजावणी झाली आहे. आम्हाला प्रतिगामी नव्हे तर पुरोगामी राजकारण करायचे आहे, असे मोदींनी म्हटले.  यावेळी त्यांनी एका भोजपुरी वाक्यप्रचाराचा दाखला देत विरोधकांना टोलाही हाणला. विरोधकांचे कृषी कायद्यांबाबतचे वर्तन म्हणजे, ‘ना खेळणार, ना खेळू देणार, मी खेळ बिघडवणार’, अशाप्रकारचे असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

नागरिकांनी याचना करायला, देशात सामंतशाही आहे का?- मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना काँग्रेसचे खासदार सातत्याने, तुम्हाला कृषी कायदे कोणी आणायलाच सांगितले नव्हते, असे बोलत होते. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. देशात एखादा कायदा आणण्यासाठी नागरिकांनी याचना करण्याची वाट पाहायला, आपल्या देशात काय सामंतशाही आहे का? लोकशाही व्यवस्थेमध्ये असे चालत नाही. लोकशाहीत सरकारने संवेदनशील राहून जबाबदारी घेतली पाहिजे. तिहेरी तलाक, आयुषमान योजना, स्वच्छ भारत योजना किंवा मुलींना वडिलांच्या संपत्तीत वाटा देण्याचा निर्णय, हे कोणी सांगितले म्हणून सरकारने केले नाही. तर नागरिकांच्या भल्यासाठी सरकारने स्वत:हून हे निर्णय घेतल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

‘कृषी कायदे बंधनकारक नाहीत, निवडीचा अधिकार तुम्हाला’

कृषी कायदे हे कोणावरही बंधनकारक नाहीत. ती केवळ एक नवी व्यवस्था आहे. त्यामुळे ही व्यवस्था स्वीकारायची की नाही, याचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. अन्यथा तुम्ही जुन्या व्यवस्थेत कायम राहू शकता. सरकारला बाजार समित्याही कायम ठेवायच्या आहेत. त्यामुळेच अर्थसंकल्पात बाजार समित्यांच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

काँग्रेस धड स्वत:चही भलं करु शकत नाही आणि देशाचंही नाही; पंतप्रधान मोदींची टीका

बाचाबाचीत पंतप्रधान मोदी संतापले; म्हणाले, अधीर रंजनजी आता जरा जास्तच होतंय

( PM Narendra Modi speech in Loksabha)

'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश
दिक्षाभूमीला वंदन करून अभिप्राय वहीत पंतप्रधानांनी दिला विशेष संदेश.
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट.
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल
हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल.
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर
साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर.
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी.
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.