Modi 3.0: मोदी मंत्रिमंडळाचा आज शपथविधी, महाराष्ट्रातून ही नावे? त्या मंत्र्यांना आज PMO तून फोन येणार
What will Modi 3.0 look like for India?: महिलांमधून रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच पंकजा मुंडे यांनाही संधी दिली जाऊ शकते. डॉ.भारती पवार यांच्या पराभवामुळे मंत्रिमंडळात महिला चेहरा देण्याचा भाजपवर दबाव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा राष्ट्रपती भवनात पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्याचवेळी तिसऱ्यांदा शपथविधी घेण्याचा पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. शपथविधी समारंभापूर्वी पंतप्रधान मोदी सकाळी साडेसहा वाजता राजघाटावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर सात वाजता माजी पंतप्रधान अटल बिहारवाजपेयी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच सकाळी साडेसात वाजता वॉर मेमोरियलवर जाऊन शहिदांना अभिवादन केले.
शरद पवार यांना निमंत्रण
शपथविधी समारंभाचे निमंत्रण शरद पवार यांना मिळाले आहे. शरद पवार सध्या मुंबईत आहेत. परंतु ते समारंभाला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण काँग्रेसला दिले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आजच्या शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. शपथविधी कार्यक्रमाला जायचे की नाही याबाबत काँग्रेस आजच निर्णय घेणार आहेत. संध्याकाळी ७.२५ वाजता मोदी यांचा शपथविधी होणार आहे.
नव्या मंत्र्यांना रविवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयातून (पीएमओ) फोन जाणार आहेत. त्यांना पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा आपल्या निवासस्थानी बोलवणार आहे. नियमानुसार मंत्रिमंडळात ७८ मंत्री असतात. परंतु आज जवळपास ४० ते ४५ जण शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहेत. एनडीएच्या घटकपक्षांनी शुक्रवारीच आपल्या मंत्र्यांची यादी भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना दिली आहे.
महाराष्ट्रातून यांना संधी
मोदी यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, अशोक चव्हाण, नारायण राणे, रामदास आठवले यांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित झाले आहे. शिवसेनेतून मिलिंद देवरा, संदीपान भुमरे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होणार आहे.
महिलांमधून रक्षा खडसे की पंकजा मुंडे?
महिलांमधून रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तसेच पंकजा मुंडे यांनाही संधी दिली जाऊ शकते. डॉ.भारती पवार यांच्या पराभवामुळे मंत्रिमंडळात महिला चेहरा देण्याचा भाजपवर दबाव आहे.
संभाव्य मंत्र्यांमध्ये आणखी कोण?
अमित शाह, जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह, एस.जयशंकर, अश्विनी वैष्णव, ललन सिंह, रामनाथ ठाकूर, चिराग पासवान, जीतन मांझी, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, प्रल्हाद जोशी, गिरिराज सिंह, नित्यानंद राय, ज्योरिरादित्य सिंधिया, मनसुख मंडविया, अनुराग ठाकूर, फग्गनसिंह कुलस्ते, शोभा करंदलाजे, किशन रेड्डी, बंडी संजय, गजेंद्रसिंह शेखावत, अर्जून मेघवाल यांची नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.