Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या हत्या, आत्महत्या, ज्यामुळे मोदी सरकारला माफी मागावी लागली, माघार घ्यावी लागली?

शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनात कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लखीमपूर खेरी येथे केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं या घटनांमुळं दबाव वाढला होता.

त्या हत्या, आत्महत्या, ज्यामुळे मोदी सरकारला माफी मागावी लागली, माघार घ्यावी लागली?
नरेंद्र मोदी, शेतकरी आंदोलक, लखीमपूर खेरी घटना
Follow us
| Updated on: Nov 19, 2021 | 11:34 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनात कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांची निहंग शीख समाजातील व्यक्तींकडून हत्या या प्रकरणांमुळं मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्याव लागल्याचं बोललं जातंय.

इकडं चर्चा स्टारकिडच्या ड्रग्जकांडाची, तिकडे केंद्रीय मंत्रीपुत्राची, 8 जणांचा मृत्यू, 4 शेतकरी

लखीमपूर खेरी प्रकरण

लखीमपूर खेरीमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा कार्यक्रम होता. शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी आंदोलन पुकरालं होतं. यावेळी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या चारचाकी वाहनाखाली शेतकऱ्यांना चिरडलं यामध्ये 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी 4 जणांना जीव गमवावा लागला. ही घटना 3 ऑक्टोबरला घडली. यानंतर केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात वातावरण तयार झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही घटना जालियनवाला बाग हत्याकांडाच्या घटनेसारखी असल्याचं म्हटलं होतं. या प्रकरणाची सुप्रीम कोर्टानं दखल घेतली असून या प्रकरणी सुनावणी सुरु आहे.

Lakhimpur Violence: हाच तो Video ज्यामुळे उत्तर प्रदेशातलं योगी सरकार संकटात, मंत्र्याच्या पोराच्या पलायनाचं प्रुफ?

9 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

शेतकरी नोव्हेंबर 2020 पासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलनाला बसले होते. आंदोलनावर तोडगा निघत नव्हता. प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेलं होतं. दुसरीकडं आंदोलक शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु होत्या. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार सिंघू बॉर्डरवर आतापर्यंत 9 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेवटची आत्महत्या 11 नोव्हेंबर 2021 ला सिंघू बॉर्डरवर झाली होती.गुरुप्रीत सिंग असं त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाचा 46वा दिवस, पुन्हा एका शेतकऱ्याची आत्महत्या

निहंग शीख समुदायातील व्यक्तीकडून आंदोलक शेतकऱ्याची हत्या

शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या सिंघू सीमेवर लखबीर सिंह या तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याचा हात कापून मृतदेह बॅरिकेडवरून लटकवण्यात आला. मृतदेह सापडल्यानंतर सिंघू सीमेवर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. निहंग शीख समुदायातील व्यक्तींनी लखबीर सिंह यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.

सिंघू सीमेवर तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, हात कापून बॅरिकेट्सवर लटकवलं

इतर बातम्या:

VIDEO | निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच मोदी सरकारने काळे कायदे मागे घेतले: संजय राऊत

Kisan Andolan News: मोदींची तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पण खरं कारण उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणुका?

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.