शरद पवार सुधारणांच्या बाजूनं, राजकारणासाठी काहींचा यूटर्न; मोदींचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपलं मौन सोडलं. (narendra modi taunt sharad pawar over farmers bill)
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्यांदाच संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपलं मौन सोडलं. शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या योजना आणि कायद्याचं महत्त्व त्यांनी संसदेत अधोरेखित करतानाच विरोधकांवरही टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेकांनी कृषी सुधारणांची वकिलीही केली. पण काहींनी राजकारणासाठी या कायद्यावरून यूटर्न घेतला, अशी अप्रत्यक्ष टीका नरेंद्र मोदी यांनी पवारांवर केली. (narendra modi taunt sharad pawar over farmers bill)
नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत कृषी कायद्यावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. आमचे आदरणीय शरद पवारजी यांनी कृषी सुधारणांची वकिली केली. शरद पवारांनी आताच सांगितलं मी कृषी सुधारणांच्या बाजूने आहेत. काँग्रेससह अनेक नेत्यांनीही कृषी सुधारणांच्या बाजूने असल्याचं सांगितलं. आता अचानक काही लोकांनी राजकारणासाठी यूटर्न घेतला. त्यासाठीच त्यांनी त्यांचे विचार मांडले, अशी अप्रत्यक्ष टीका मोदींनी पवारांवर केली. कृषी कायद्याबाबत माझं म्हणणं ऐकू नका, पण किमान मनमोहन सिंग यांचं तरी म्हणणं ऐका. मनमोहन सिंग यांनी जे सांगितलं. तेच मोदी करत आहे, याचा अभिमान तर बाळगा, असं टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या घोषणांचा उल्लेख केला. छोट्या शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना आणली, आम्ही पहिल्यांदाच किसान रेल्वे आणली. याचा फायदा छोट्या शेतकऱ्यांनाच होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
श्रेय तुम्ही घ्या, शिव्या माझ्या खात्यात जमा करा
आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहोत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. कोणताही तणाव नाही. फक्त शेतकऱ्यांनी बुजुर्गांना घरी पाठवलं पाहिजे, असं सांगतानाच आता शेतीत मोठी सुधारणा झाली पाहिजे. आज जे मी केलं, ते उद्या कुणाला तरी करावंच लागलं असतं. हवं तर तुम्ही त्याचं श्रेय घ्या. शिव्या माझ्या खात्यात येऊ द्या, पण नव निर्माण करण्यासाठी आपण काही केलं पाहिजे, त्यासाठी पुढे या असं आवाहनही त्यांनी केलं.
एमएसपी अधिक सक्षम होईल
सुधारणांना एक संधी दिली पाहिजे. काही चुका असतील तर दुरुस्त करू. विश्वास ठेवा. बाजार समित्या, आडत्या अधिक समक्षम होतील. एमएसपी आहे. एमएसपी होता आणि एमएसपी राहील, असं जाहीरपणे सांगतानाच स्वस्त रेशन देण्याचं कामही सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांवर टीका
यावेळी त्यांनी कोरोना संकटावरून विरोधकांवर टीका केली. कोरोना संकट आलं तेव्हा जग भारतासाठी चिंतेत होतं. भारत स्वत:ला या संकटातून सावरेल की नाही, असं जगाला वाटत होतं. भारताने आल्या नागरिकांच्या रक्षणासाठी अज्ञात शत्रूशी लढा दिला. भारताने ही लढाई जिंकली म्हणून आज जगाला भारताचा अभिमान वाटत आहे. भारताने ही लढाई कोणत्याही सरकार किंवा व्यक्तीच्या विरोधातील लढाई जिंकली नाही. मात्र, तरीही याचं क्रेडीट भारताला जातं, असं मोदी म्हणाले. कोरोना काळात वृद्ध महिलेने झोपडीच्या बाहेर दिवा लावला. तिची खिल्ली उडवली गेली. देशाचं मनोबल खच्चीकरण होईल, अशा गोष्टीत विरोधकांनी गुरफटून जाऊ नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. (narendra modi taunt sharad pawar over farmers bill)
VIDEO : राष्ट्रपतींचं भाषण हे आत्मनिर्भर भारताचं दर्शन घडवणारं : पंतप्रधान मोदी#PMRajyaSabha #PMModi @PMOIndia @narendramodi @BJP4India pic.twitter.com/Xc1Wio8RCb
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
संबंधित बातम्या:
‘अवसर तेरे लिए खडा है, फिर भी तू चूपचाप पडा है’; मैथिली शरण गुप्त यांच्या कवितेतून मोदींचा संवाद!
PM Narendra Modi Live : MSP होता, आहे आणि राहील, ग्वाही देतोय : पंतप्रधान
(narendra modi taunt sharad pawar over farmers bill)