PM Modi Speech Highlights | पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केले – शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करणार आहे. मोदी आज काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागून होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संभाषणात मोठा घोषणा करत वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केलीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करणार आहे. मोदी आज काय बोलणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागून होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संभाषणात मोठा घोषणा करत वादग्रस्त तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केलीये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत असं सांगून शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं.
आज पंतप्रधान उत्तर प्रदेशातील महोबा येथे सिंचनाशी संबंधित महत्त्वाच्या योजनांचे उद्घाटन करतील. त्यानंतर ते ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’साठी झाशीला जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी 9 वाजता देशाला संबोधित केलं.
LIVE NEWS & UPDATES
-
पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केले – शरद पवार
– संघर्ष झाला त्यात उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणाचे मोठ्या प्रमाणात शेतकरी होते
– पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केले
– उशिरा का होईना शहानपण आलं
– संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना सलाम
-
देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केलं – शरद पवार
शरद पवार –
– या कायद्यासंदर्भात अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती
– त्यामध्ये अनेक मुद्दे होते, त्याबाबत केंद्र सरकार विचार करत होती
– त्यावेळी कायद्यात दुरस्ती करावी का याबाबत चर्चा झाली
– यासंबंधिचे निर्णय मंत्रिमंडळामध्ये किंवा देशामध्ये घ्यावे या मताचा मी नव्हतो
– कृषी हा विषय राज्य सरकारचा आहे त्यामुळे राज्य सरकारला विश्वासात घेऊन राज्याची उपस्थितीत कृषी संघटनांना विश्वासात घेऊन आपण या संबंधिचा विचार करायला पाहिजे, हे आम्ही ठरवलं होतं
– कृषी कायद्याबाबत केंद्र सरकारने संसदेत, राज्याबाबत आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली नव्हती
– कृषी संबंधीत कायदे करायचे असल्यास त्यावर सविस्तर चर्चा अपेक्षित होती, पण सत्ताधाऱ्यांनी होऊ दिली नाही
– या कृषी कायद्यामुळे शेती अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार होते
– देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांनी एक वर्ष आंदोलन केलं.
-
-
नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणाले, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा: प्रियांका गांधी
शेतकऱ्यांना राजकीय नेत्यांनी आंदोलनजीवी म्हटलं, शेतकऱ्यांना गुंड म्हटलं गेलं. नरेंद्र मोदी आंदोलनजीवी म्हणाले. शेतकऱ्यांना अटक केलं जातं होतं. आज तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा. या सरकारला देशात शेतकऱ्यांशिवाय कोणीही मोठं नाही हे समजलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी या आंदोलनादरम्यान जीव गमावला त्यांना आदरांजली आहे. केंद्रीय मंत्र्याला बरखास्त केलं पाहिजे. संपूर्ण देशात शेतकऱ्यांचा आवाज आहे त्या सोबत आपल्याला उभं राहावं लागेल. रासायनिक खतं मिळवताना रांगेत शेतकऱ्यांनी जीव गमावला आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. सर्व राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला. शेतकरी दिल्लीच्या सींमावर आंदोलन करत राहिले त्यासंदर्भात शेतकऱ्यांचं अभिनंदन करते, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.
-
फक्त कायदे मागे घेऊन कसं भागणार, शेतकऱ्यांचे मृत्यू, झालेला त्रास, याला जबाबदार कोण? – थोरात
पंजाबच्या शेतकऱ्यांनी खूप मोठं योगदान दिलं
स्वस्त धान्य देण्याचं कामही या शेतकऱ्यांनी केलं
दीड पट हमीभावावर बोलायला सरकार तयार नाही
शेतकऱ्यांना चिरडून मारण्याचं काम करण्यात आलं
संपूर्ण जगात देशाची निंदा झाली
आज हे कायदे मागे घेण्यात आले
फक्त कायदे मागे घेऊन कसं भागणार, शेतकऱ्यांचे मृत्यू, झालेला त्रास, याला जबाबदार कोण?
-
शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याचा विजय आहे हा – बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात –
कृषी कायदे रद्द झाले हे चांगलंच झालं
शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याचा विजय आहे हा
कायदा झाल्यानंतर फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत
-
-
अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे त्यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यायला लावले – राहुल गांधी
“देशाच्या अन्नदाताच्या सत्याग्रहामुळे त्यांना शेतीविषयक कायदे मागे घ्यायला लावले आहेत. अन्यायाविरोधातील या विजयाच्या शुभेच्छा”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.
देश के अन्नदाता ने सत्याग्रह से अहंकार का सर झुका दिया। अन्याय के खिलाफ़ ये जीत मुबारक हो!
जय हिंद, जय हिंद का किसान!#FarmersProtest https://t.co/enrWm6f3Sq
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 19, 2021
-
सरकारला एक वर्षाचा कालावधी लागला, यामध्ये किती शेतकरी शहीद झाले, सरकारला लाज वाटायला हवी – राकेश टिकैत
राकेश टिकैत
सरकारकडून पुढाकार घेण्यात आला आहे
संसदेत रद्द करा
एमएसपीवर सरकारची भूमिका काय ते स्पष्ट करा
सरकारला एक वर्षाचा कालावधी लागला, यामध्ये किती शेतकरी शहीद झाले, सरकारला लाज वाटायला हवी
देशात लोकशाही आहे हुकूमशाही नाही
एका कायद्यासाठी एक वर्ष लागत असेल तर ते चुकीचं
-
सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही – नवाब मलिक
“सात वर्षांत मोदींनी कुठलंही पाऊल मागे घेतलं नाही. उत्तर प्रदेश, पंजाबच्या निवडणुका पुढे आहेत. त्यामुळे त्यांना कळालं की आता या देशात परिवर्तन होणार आहे. आज जो निर्णय झालाय तो शेतकऱ्यांचा विजय आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.
‘झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए’ तीनों कृषि कायदे वापस लिए गए, हमारे देश के किसानों को मेरा सलाम और शहीद किसानो को अभिवादन
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
-
मोदींच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलन आजच संपणार नाही
मोदींच्या घोषणेनंतरही शेतकरी आंदोलन आजच संपणार नाही, टिकैत म्हणतात, संसदेतल्या त्या दिवसाची वाट पहाणार.
-
तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
शेतकऱ्यांसाठी ३ कायदे आणण्यात आलेत
शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याच्या या देशात तीन कृषी कायदे आणण्यात आले
देशातील शेतकर्यांना विशेषत: लहान शेतकर्यांना अधिक बळ मिळावे, त्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि शेतमाल विकण्याचे अधिकाधिक पर्याय उपलब्ध व्हावेत, हा उद्देश होता
आमचे सरकार शेतकर्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकर्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने शेतकऱ्यांसाठी चांगल्या हेतूने हा कायदा आणला होता
पण एवढी पवित्र, निव्वळ शुद्ध, शेतकऱ्यांच्या हिताची बाब, आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही.
कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी यांनीही त्यांना कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला
आम्ही मोकळ्या मनाने कृषी कायद्यांचं महत्त्वं समजावलं, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची बाजू समजण्याचाही प्रयत्न केले, हा विषय मा. सर्वोच्च न्यायालयातही गेला, कदाचित आमच्या तपस्येत कमतरता राहिली असेल,
शेतकऱ्यांना आम्ही समजावण्यात कमी पडोल आहोत. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत
तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद सत्रात हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करु
या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू
-
देशाने आपल्या ग्रामीण बाजारपेठेच्या पायाभूत सुविधा मजबूत केल्या – पंतप्रधान मोदी
शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाच्या मोबदल्यात त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी अनेक पावलेही उचलण्यात आलीये
देशाने आपल्या ग्रामीण बाजारपेठेच्या पायाभूत सुविधा मजबूत केल्या
-
आम्ही केवळ एमएसपी वाढवली नाही, तर विक्रमी सरकारी खरेदी केंद्रेही निर्माण केली – पंतप्रधान मोदी
आम्ही केवळ एमएसपी वाढवली नाही, तर विक्रमी सरकारी खरेदी केंद्रेही निर्माण केली
आपल्या सरकारने केलेल्या मालाच्या खरेदीने गेल्या अनेक दशकांचा विक्रम मोडला आहे
-
लहान शेतकर्यांसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही बियाणे, विमा, बाजारपेठ आणि बचत यावर काम केले – पंतप्रधान
देशातील लहान शेतकर्यांसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी आम्ही बियाणे, विमा, बाजारपेठ आणि बचत यावर काम केले
चांगल्या दर्जाच्या बियाण्यांसोबतच सरकारने शेतकऱ्यांना नीम कोटेड युरिया, मृदा आरोग्य कार्ड, सूक्ष्म सिंचन यांसारख्या सुविधाही जोडल्या
देश के छोटे किसानों की चुनौतियों को दूर करने के लिए, हमने बीज, बीमा, बाजार और बचत, इन सभी पर चौतरफा काम किया।
सरकार ने अच्छी क्वालिटी के बीज के साथ ही किसानों को नीम कोटेड यूरिया, सॉयल हेल्थ कार्ड, माइक्रो इरिगेशन जैसी सुविधाओं से भी जोड़ा: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 19, 2021
-
पीक विमा योजनेला अधिक प्रभावी केलंय – पंतप्रधान मोदी
पीक विमा योजनेला अधिक प्रभावी केलंय
जास्तीत जास्त शेतकऱ्य़ांना पीक विमा योजनेत सामावून घेतलंय
त्यासाठी सर्व जुने नियम बदलले
त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा मोबदला मिळाला आहे
विमा आणि पेन्शन सुविधाही मिळवून दिली
-
शेतकऱ्यांसाठी आम्ही सर्व बाजूनं कामं केलं: नरेंद्र मोदी
आज देव दिवाळीचं प्रकाशपर्व आहे आणि आज गुरुनानक यांचं पावन प्रकाश पर्व आहे. आज मी यासंदर्भात सर्वांना शुभेच्छा देतो. दीड वर्षानंतर कर्तारपूर कॉरिडॉर खुला झाला आहे. गुरुनानक यांनी संसारात सेवेचा मार्ग अवलंबल्यास जीवन यशस्वी होतं, असं मोदी म्हणाले. आमचं सरकार सेवा भावनेतून देशवासियांचं जीवन सुलभ बनवण्यास कटिबद्ध आहे. गेल्या अनेक पिढ्या स्वप्न पाहत होती ती स्वप्न पूर्ण करत आहे. माझ्या राजकीय जीवनात मी शेतकऱ्यांच्या समस्या अनुभवल्या आहेत. देशानं मला पंतप्रधान म्हणून संधी दिल्यानंतर मी शेती विकासाला प्राधान्य दिलं.
देशातील शंभरमधील 80 शेतकरी छोटे शेतकरी आहेत. त्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. या शेतकऱ्यांची संख्या 10 कोटींपेक्षा अधिक आहे. छोट्या जमिनीच्या सहाय्यानं ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. हे अनेक लोकांना माहिती नाही. देशातील छोट्या शेतकऱ्यांसमोरील आव्हानं दूर करण्यासाठी बियाणं, विमा आणि बाजारपेठ यावर सर्व बाजूनं कामं केलं, असं मोदी म्हणाले.
आमच्या सरकारनं 22 कोटी सॉईल हेल्थ कार्ड शेतकऱ्यांना दिली. या वैज्ञानिक उपक्रमामुळं उत्पन्न वाढलं. पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवली. आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना जादा निधी मिळावा म्हणून आम्ही नियम बदलले. गेल्या चार वर्षात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. आम्ही शेतमजूर यांच्यासाठी विमा आणि पेन्शन योजना आणली. शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 65 हजार कोटी वर्ग केले.
शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळावा म्हणून अनेक प्रयत्न केले, आम्ही एमएसपी वाढवली, रेकॉर्डब्रेक खरेदी केंद्र वाढवली. देशातील एक हजाराहून अधिक बाजार समित्यांना ई-नाम शी जोडलं. यामुळं देशातील कोणत्याही ठिकाणी शेतकरी माल पाठवू लागला. आम्ही बाजार समित्यांच्या विकासावर काम केलं.
कृषी क्षेत्रावरील बजेट पाचपट वाढवलं. दरवर्षी सव्वालाख कोटी रुपये शेती क्षेत्रावर खर्च केले जात आहेत. गाव आणि शेतीच्या जवळपास गोदाम आणि कृषी उपकरणांचा विकास यासाठी वेगानं काम करण्यात येत आहे. छोट्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी एफपीओ वर काम सुरु आहे. 10 हजार एफएपीओ निर्माण करत आहोत.
शेतकरी उत्पादक कंपन्यांवर 7 हजार कोटी केला जातोय. मायक्रो इरिगेशनवर 10 हजार कोटी खर्च होतोय. पीक कर्ज 16 लाख कोटींवर नेत आहोत. मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देत आहोत. आमचं सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत आहोत.शेतकऱ्यांचा विकास व्हावा म्हणून आमचं सरकार प्रामाणिकपणे काम करत आहोत.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही कायदे आणले पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. आता आम्ही हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
-
जमिनीच्या छोट्या तुकड्यावर हे शेतकरी आपला उदर्निवाह करतात – पंतप्रधान
80 टक्के शेतकरी असे ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन
देशात असे १० करोड शेतकरी
जमिनीच्या छोट्या तुकड्यावर हे शेतकरी आपला उदर्निवाह करतात
त्यावरच ते स्वत: आणि कुटुंबाचं पालन करतात
छोट्या शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय
-
भारत अनेक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे – पंतप्रधान
भारत अनेक स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे
दीड वर्षांनंतर कर्तारपूर कॉरि़डोर सुरु झालाय
-
पणजी उत्पल पर्रीकर भाजपला सोडचिठ्ठी देणार?
पणजी उत्पल पर्रीकर भाजपला सोडचिठ्ठी देणार?
उमेदवारी द्या नाहीतर वेगळा विचार करेन उत्पल यांचा भाजपला इशारा
दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या मुलाचा भाजपला इशारा
पणजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी
काँग्रेस नेते अतानासियो मोन्सेरात यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता
विधानसभा निवडणुकीपूर्वी गोवा भाजपात मोठा गोंधळ
Published On - Nov 19,2021 8:54 AM