Narendra Modi : यूरोप, आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचा उद्रेक, मोदींनी तातडीची बैठक बोलवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत  ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा  आढावा घेतील.

Narendra Modi : यूरोप, आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचा उद्रेक, मोदींनी तातडीची बैठक बोलवली
narendra modi
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 11:38 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi)आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत  ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा  आढावा घेतील. या बैठकीचं अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांच्याकडेच असेल. ही बैठक सकाळी 10.30 वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.यूरोपमधील कोरोना विषाणू संसर्गामुळं निर्माण झालेली परिस्थिती आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात भारतानं कोणती काळजी घ्यावी आणि उपाययोजना करावी, यासंदर्भात तातडीच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

यूरोप आणि आफ्रिकेतील स्थितीवर चर्चा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीत यूरोपात झालेला कोरोनाचा विस्फोट आणि  तिथल्या काही देशांना पुन्हा करावं लागलेलं लॉकडाऊन आणि दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन यासंदर्भात चर्चा होईल, अशी शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी केंद्र सरकारच्या बड्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली असून त्यामध्ये यूरोप आणि आफ्रिकेत निर्माण झालेल्या स्थितीनंतर भारतानं कोणती काळजी घ्यावी. परदेशातून भारतात  येणाऱ्या प्रवाशांबद्दल कोणते निर्णय घेण्यात यावेत या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

लसीकरणावर देखील चर्चा

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी भारतात कोविशील्ड, कोवॅक्सिन, रशियाची स्पुतनिक वी या लसींना परवानगी देण्यात आली आहे. भारतानं शंभर कोटींच्यालसीकरणाचा टप्पा यापूर्वीच पूर्ण केला आहे. मात्र, सध्या कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळं कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारनं हर घर दस्तक ही मोहीम राबवली आहे. कोरोना लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणखी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील यासदंर्भात देखील नरेंद्र मोदी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

केंद्राचे राज्यांना अलर्ट राहण्याचे आदेश

भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या: 

मोठी बातमी ! फ्रान्स, जर्मनी, इंग्लंडमध्ये कोरोनाची तिसरी लाट धडकली, पोर्तुगाल, झेक रिपब्लिकमध्ये आणीबाणीची घोषणा

Corona New Variant : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट, भारत सरकार सतर्क, राज्यांना महत्त्वाचे आदेश

Narendra Modi to chair a meeting with top govt officials on the COVID-19 situation and vaccination at 10:30 am today

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.