नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी? पाहा कोणाकडे आहे सर्वात जास्त संपत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात उत्पन्न, मालमत्ता आणि गुंतवणुकीची माहिती दिली आहे. राहुल गांधी यांनी 3 मे रोजी रायबरेलीत उमेदवारी दाखल करताना प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती आणि बचतीची माहिती दिली होती. कोणाकडे किती संपत्ती आहे जाणून घ्या.

नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी? पाहा कोणाकडे आहे सर्वात जास्त संपत्ती
Follow us
| Updated on: May 14, 2024 | 10:18 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. पंतप्रधान मोदींनी आज वाराणसीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यावेळीही दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत. वायनाड मतदारसंघात  २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले आहे. तर रायबरेलीच्या जागेवर २० मे रोजी मतदान होणार आहे. तर 1 जूनला शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदींच्या वाराणसी जागेसाठी मतदान होणार आहे. पीएम मोदींनी आज जेव्हा त्यांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं त्यात त्यांनी त्यांच्या संपत्तीची ही घोषणा केली आहे. जाणून घेऊयात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्याकडे किती संपत्ती आहे.

 उत्पन्नाचा स्रोत काय?

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्पन्नाचा प्राथमिक स्त्रोत म्हणजे त्यांचे सरकारी वेतन आणि त्यांच्या बचतीवरील व्याज. – राहुल गांधी यांचा उत्पन्नाचा स्त्रोत खासदारांचा पगार, रॉयल्टी, भाडे, रोख्यांचे व्याज, लाभांश आणि म्युच्युअल फंडातील भांडवली नफा

कोणाकडे किती मालमत्ता?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2022-23 मध्ये पीएम मोदींचे एकूण उत्पन्न 23 लाख 56 हजार 080 रुपये होते. पीएम मोदींची एकूण संपत्ती 3 कोटी 02 लाख 06 हजार 889 रुपये आहे.
  • 2022-23 या आर्थिक वर्षात काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे एकूण उत्पन्न 1 कोटी 2 लाख 78 हजार रुपये होते. राहुल गांधी यांच्याकडे 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची जंगम आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त अचल संपत्ती आहे. अशा प्रकारे त्यांच्याकडे 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

कोणाकडे किती रोख?

-प्रतिज्ञापत्रानुसार, पंतप्रधान मोदींकडे एकूण 52 हजार 920 रुपये रोख स्वरूपात आहेत. -प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल गांधींकडे सध्या 55 ​​हजार रुपये रोख आहेत.

बँक खात्यात किती रक्कम?

-पीएम मोदींच्या स्टेट बँक ऑफ गांधीनगरच्या खात्यात 73 हजार 304 रुपये जमा आहेत. वाराणसीच्या बँक खात्यात एकूण 7000 रुपये जमा आहेत. -काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बँक खात्यात २६ लाख २५ हजार रुपये जमा आहेत.

गुंतवणूक आणि मुदत ठेव?

-पीएम मोदींच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात 2 कोटी 85 लाख 60 हजार 338 रुपयांची मुदत ठेव (एफडी) आहे. पीएम मोदींकडे राष्ट्रीय बचत योजनेत (NSS) ९ लाख १२ हजार ३९८ रुपये आहेत. -राहुल गांधी यांच्याकडे राष्ट्रीय बचत योजना (NSS), पोस्टल बचत आणि विमा पॉलिसीद्वारे सुमारे 61.52 लाख रुपये जमा आहेत.

शेअर मार्केटमध्ये किती पैसे गुंतवले?

-राहुल गांधी यांनी शेअर मार्केटमध्ये एकूण 4.33 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यांनी म्युच्युअल फंडात 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. राहुल यांनी त्याच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये ITC, ICICI बँक, Alkyl Amines, Asian Paints, Bajaj Finance, Deepak Nitrite, Divi’s Laboratories, Infosys, Tata Consultancy Services (TCS), Britannia Industries आणि Titan Company मध्ये पैसे गुंतवले आहेत. – पंतप्रधान मोदींनी शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक केलेली नाही.

कोणाकडे किती दागिने आहेत?

-पीएम मोदींकडे 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्यांची किंमत 2 लाख 67 हजार 750 रुपये आहे. -राहुल गांधी यांच्याकडेही 4.2 लाख रुपयांचे 333.3 ग्रॅम सोने आहे. त्यांच्याकडे 15,21,740 रुपयांचे सोन्याचे रोखेही आहेत.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.