नरेंद्र मोदीजी आमचे शत्रू नाहीत, त्या व्हिडिओवर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची प्रतिक्रिया
अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यासाठी जगभरातून लोकं पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी हजेरी लावली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची देखील भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,
अनंत अंबानी यांच्या लग्नाच्या सध्या सगळीकडे चर्चा आहेत. या लग्न सोहळ्यासाठी अनेक मोठे लोकं पोहोचले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अनंत अंबानी आणि राधिका यांना आशीर्वाद दिला. या लग्न सोहळ्यात आणखी एक गोष्ट समोर आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये ते ज्योतिर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचे चरणस्पर्श करताना दिसले. या व्हिडिओबाबत आता शंकराचार्यांनी वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले अविमुक्तेश्वरानंद?
पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, ‘ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. आमच्याकडे जो येईल त्याला आशीर्वाद द्यायचा आमचा नियम आहे. नरेंद्र मोदी हे आमचे शत्रू नाहीत. आम्ही त्यांचे हितचिंतक आहोत आणि सदैव त्यांच्या कल्याणासाठी बोलतो. त्यांच्याकडून काही चूक झाली तर आम्ही त्यांनाही सांगतो.
पीएम मोदी आणि अविमुक्तेश्वरानंद यांचा हा व्हिडिओ शनिवारचा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहानंतर दुसऱ्या दिवशी शुभ आशीर्वाद ठेवण्यात आले होते. जेथे अनेक मोठे लोकं पोहोचले होते. या कार्यक्रमातच पीएम मोदी यांनी अविमुक्तेश्वरानंद यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी अविमुक्तेश्वरानंद यांचे चरण स्पर्श करून अभिवादन केले. शंकराचार्यांनीही त्यांना आशीर्वाद म्हणून त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ दिली. यानंतर पीएम मोदींनी इतर संतांचे आशीर्वादही घेतले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
#WATCH मुंबई: दिल्ली में बनने वाले केदारनाथ मंदिर पर ज्योतिर्मठ के शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद ने आरोप लगाया, “केदारनाथ में सोना घोटाला हुआ है, उस मुद्दे को क्यों नहीं उठाया जाता? वहां घोटाला करने के बाद अब दिल्ली में केदारनाथ बनेगा? और फिर एक और घोटाला होगा। केदारनाथ से… pic.twitter.com/2t95IO25Gg
— ANI_HindiNews (@AHindinews) July 15, 2024
आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, या व्हिडिओ वर इतकी चर्चा का होत आहे. त्यामागचं कारण म्हणजे हे तेच शंकराचार्य आहेत ज्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले होते की, हे उद्घाटनच चुकीचे आहे कारण राम मंदिर अद्याप पूर्ण झालेले नाही. अर्धवट राहिलेल्या मंदिरात देवाची प्रतिष्ठापना करणे न्याय्य आणि धार्मिक नाही, असं मत त्यांनी मांडले होते. त्यामुळे ते राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला देखील आले नव्हते.
दिल्लीत बांधल्या जात असलेल्या केदारनाथ मंदिराबाबत ही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्योतिर्मठ स्वामी अविमुक्तेश्वरानंदचे शंकराचार्य यांनी आरोप केला की, ‘केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे, हा मुद्दा का उपस्थित केला जात नाही? तिथल्या घोटाळ्यानंतर केदारनाथ दिल्लीत बांधणार का? आणि मग आणखी एक घोटाळा होईल. केदारनाथमधून 228 किलो सोने गायब आहे. तपास सुरू झालेला नाही. याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.