बायकोच्या मनात रोष नको म्हणून… मिस्टर आणि मिसेस झिरवळ पुन्हा चर्चेत; आता दौरा कुठे?

राज्यातील 20 सर्व पक्षीय आमदार दिल्लीत आले आहेत. हे सर्व आमदार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नेतृत्वात हे आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत.

बायकोच्या मनात रोष नको म्हणून... मिस्टर आणि मिसेस झिरवळ पुन्हा चर्चेत; आता दौरा कुठे?
narhari zirwalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 12:53 PM

संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे राज्यातील 20 सर्व पक्षीय आमदारांसह नवी दिल्लीत आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेण्यासाठी झिरवळ हे दिल्लीत आले आहेत. झिरवळ हे दिल्लीत सपत्नीक आले आहेत. पत्नीला दिल्लीत आणण्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर, धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाहीये. त्यांना आरक्षण दिलं पाहिजे. पण त्यांचा आदिवासींमध्ये समावेश करू नये, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.

नरहरी झिरवळ हे मीडियाशी संवाद साधत होते. माझ्या बायकोला दिल्लीला घेऊन आलोय. मी दौऱ्यावर जात असतो पण तिला कुठे नेलं नव्हतं. त्यामुळे तिला सोबत आणलंय. तिच्या मनात माझ्याबद्दल रोष नको म्हणून घेऊन आलोय, असं नरहरी झिरवळ यांनी म्हटलं आहे.

आमच्यात आरक्षण नको

आमच्या भगिनी द्रोपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या आहेत. आदिवासी समाजातील ज्या समस्या आहेत त्या हक्काच्या ठिकाणी मांडाव्या यासाठी दिल्लीत आलो आहे. आदिवासींमध्ये धनगर समाज आरक्षण मागतोय. आमचा धनगर समाजाला विरोध नाही. फक्त आमच्यात त्यांना आरक्षण देऊ नये, अशी आमची मागणी आहे. हे आमचं हक्काचं आरक्षण आहे. या मागणीसाठी आम्ही राष्ट्रपतींना विनंती करणार आहोत, असं झिरवळ यांनी स्पष्ट केलं.

आदिवासी समाजालाच अडचणी

पेसा भरती, अधिसंख्य पद ठरवले आहेत. वनदाव्यांचा प्रश्न आहे. आदिवासी समाज जंगलात राहतो. आदिवासी समाज हा जंगल जमिनीचा मूळ मालक आहे. पण त्यालाच अडचणी येत आहेत. पाणीसाठा, रस्त्याचा प्रश्न आहे. आदिवासी समाजापर्यंत विकास पोहोचायला पाहिजे, असंही ते म्हणाले.

कुणाला कसा अर्थ घ्यायचा…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. चर्चा या चर्चाच असतात. अजितदादांची परवापासून तब्येत ठिक नाही. दादा अनेक बैठकीला काल नव्हते. त्याचा अर्थ कोणाला कसा घ्यायचा तो तसा घेतो, असंही ते म्हणाले.

त्यांच्या मनातलं कसं सांगू…

16 आमदारांच्या अपात्रतेवर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. विधानसभा अध्यक्ष हे सुद्धा एक कोर्टच आहे. त्यांना सर्वाधिकार आहेत. आता त्यांच्या मनातलं मी कसं सांगू? असा सवाल त्यांनी केला.

ती संख्या कमी करा

सर्वोच्च न्यायालयाने आदिवासीचं बोगस सर्टिफिकेट घेऊन नोकरी करणाऱ्या 12 हजार 500 लोकांना कामावरून काढण्याचे आदेश दिले होते. या संख्येत अजून वाढ झाली आहे. ती कमी केली पाहिजे. आमची बिंदू नियमावली 2017 प्रमाणे असावी अशी मागणी आम्ही आदिवासी आयोगाकडे केली आहे, असं आमदार अमशा पाडवी यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
'दादांची मी माफी मागते...', जाहीरपणे पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?.
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?
... तर माझ्या विजयात उद्धव ठाकरेंचा खारीचा वाटा, राणे असं का म्हणाले?.
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा
“माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद…”, सत्तारांच्या वक्तव्यानं चर्चा.
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला
'उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील...'; राज ठाकरेंचा टोला.
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका
'मला पैशांची मदत करा',भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन,रोहित पवारांची टीका.
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला
'जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा..',बॅग तपासणीवरून भाजपचा ठाकरेंना टोला.
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?
सुप्रिया सुळे निवडणुकीनंतर फडणवीसांवर केस करणार, प्रकरण नेमकं काय?.
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेतून दिली एक गुड न्यूज; म्हणाल्या....
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.