गुलाल ऐवजी नारळ फेकून मारला, डोक्यातून रक्तच आलं, महाराज जखमी, कथा वाचनाचा कार्यक्रम तडकाफडकी रद्द
कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा गेल्या काही वर्षांपासून बरेच चर्चेत आहेत. ते शिवपुराणावर आधारित कथावाचनाचा कार्यक्रम करतात. ते जिथेही जातात भाविकांची अलोट गर्दी होते. मात्र आता याचा प्रदीप मिश्रांबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या डोक्याला दुखापत झालयाने ते जखमी झाले.
कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा गेल्या काही वर्षांपासून बरेच चर्चेत आहेत. ते शिवपुराणावर आधारित कथावाचनाचा कार्यक्रम करतात. ते जिथेही जातात भाविकांची अलोट गर्दी होते. मात्र आता याचा प्रदीप मिश्रांबद्दल एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या डोक्याला दुखापत झालयाने ते जखमी झाले आहेत.
आष्टा येथे महादेवाची होळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तेथे रंग खेळतानाच कोणीतरी नारळ फेकून मारला आणि तो प्रदीप मिश्रा यांच्या डोक्याला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या गंभीर दुखापतीमुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा तसेच काही दिवस तरी कथा वाचनाचा कार्यक्रम न करण्याचा सल्ला दिला आहे.
या दुखापतीमुळे आता पुढील महिनाभर तरी कथावाचनाचा कार्यक्रम होणार नाही. पुढील वर्षी हा कथावाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. त्याचा सर्व खर्च कुबरेश्वर समिती, सिहोर द्वारे करण्यात येईल.
कोण आहेत पंडीत प्रदीप मिश्रा ?
कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा गेल्या दोन वर्षांपासून बरेच चर्चेत आहेत. ते शिवपुराणावर आधारित कथावाचनाचा कार्यक्रम करतात. ते जिथेही जातात भाविकांची अलोट गर्दी होते. कथेसोबतचे ते सुखी जीवनासाठी छोटे-छोटे उपायही सांगतात, त्यामुळेही ते लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्म 1980 साली सिहोरमध्ये झाला. त्यांनी ग्रॅज्युएशन केले आहे.
त्यांचे वडील जास्त शिकलेले नव्हते, त्यांची चहाची गाडी होती, ज्यावर प्रदीप मिश्रा हेदेखील वडिलांची मदत करायचे. मिश्रा यांना लहानपणापासूनच भक्ति भजनात रुची होती, शालेय दिवसातही ते भजन कीर्तन करायचे. ते थोडे मोठे झाल्यावर सिहोर येथील एका ब्राह्मण परिवारातील महिलेने त्यांना कथावाचक बनण्याची प्रेरणा दिली, उद्युक्त केले. त्यांनी त्याचे विधीवत शिक्षण घेतले.
पंडीत प्रदीप मिश्रा यांनी सुरूवातीला शिव मंदिरात वाचन सुरू केले . सिहोरमध्ये त्यांनी कथावाचक म्हणून सुरूवात केली. त्यांचे युट्यूब आणि फेसबूकवर लाखो फॉलोअर्स आहेत. ते बरेच लोकप्रियही आहेत.