Mann Ki Baat: प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान पाहून देश दुखी झाला; मोदींनी मौन सोडलं

| Updated on: Jan 31, 2021 | 11:53 AM

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये उल्लेख केला. (‘Nation was shocked to witness insult of tricolour on republic day,’ says PM Modi)

Mann Ki Baat: प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान पाहून देश दुखी झाला; मोदींनी मौन सोडलं
Government Companies
Follow us on

नवी दिल्ली: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये उल्लेख केला. 26 जानेवारी रोजी तिरंग्याचा अपमान झाला. त्यामुळे देश दुखी झाला, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांनी पहिल्यांदाच शेतकरी आंदोलना दरम्यान उसळलेल्या हिंसेवर भाष्य केलं आहे. (‘Nation was shocked to witness insult of tricolour on republic day,’ says PM Modi)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या वर्षात पहिल्यांदाच मन की बातद्वारे देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लाल किल्ल्यावर झालेल्या तिरंग्याच्या अपमानावर भाष्य केलं. 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरी करण्यात आली. त्यानंतर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची शानदार परेडही पाहिली. या महिन्यात क्रिकेट जगातूनही चांगली बातमी आली. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची सीरिज जिंकली. आपल्या खेळाडूंची मेहनत आणि टीमवर्क सर्वांनाच प्रेरणादायी आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील घटनेकडेही देशावासियांचं लक्ष वेधलं. याच दरम्यान दिल्लीत 26 जानेवारीच्या दिवशी तिरंग्याचा अपमान पाहिला. त्यामुळे देश दुखी झाला. आपल्याला येणारा काळ आशा आणि नाविन्याने ओतप्रोत भरायचा आहे. गेल्यावर्षी आपण संयम आणि साहस दाखवलेलं आहे. त्यामुळे या वर्षी मेहनत करून आपले सर्व संकल्प पूर्ण करायचे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

यंदापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू

यावेळी मोदींनी स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याने यंदापासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू होत असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी देशावासियांनी शहिदांप्रती लिहिलेल्या भावना वाचून दाखवल्या. तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांबाबत संशोधन करून त्यांच्यावर लेख लिहिण्याचं आवाहन केलं. ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानावर दस्ताऐवज करण्यात येणार असून त्यासाठी लेख देण्याचं आवाहन त्यांनी केलं. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर त्याची माहिती देण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मेड इन इंडिया व्हॅक्सीन हाच आत्मनिर्भर भारत

मोदींनी मन की बातमध्ये लसीकरणावरही भाष्य केलं. मेड इन इंडिया व्हॅक्सिन हे आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असल्याचं ते म्हणाले. भारताची कोरोनाची लस संपूर्ण जागासाठी आशेचा किरण ठरली आहे. तसेच आपल्या देशातच जगातील सर्वाच मोठे लसीकरण सुरू आहे, असंही ते म्हणाले. गेल्या 15 दिवसात देशात 30 लाख कोविड योद्ध्यांना लस टोचली आहे. अमेरिकेला याच कामासाठी 18 तर ब्रिटन सारख्या समृद्ध देशाला 36 दिवस लागले, याकडेही त्यांनी देशावासियांचे लक्ष वेधले.

झांशीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती तर हैदराबादमध्ये भाजपाल्यांपासून वीज

यावेळी मोदींनी मध्यप्रदेशातील झांशीमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यात येत असल्याचं सांगितलं. गुरलीन चावला यांनी आधुनिक तंत्राचा वापर करून आधी आपल्या घरी आणि नंतर शेतात स्ट्रॉबेरीची शेती केल्याचं ते म्हणाले. तर हैदराबादमध्ये एका भाजी मंडईने भाज्या फेकून न देता त्यापासून वीज निर्माण करण्याचा संकल्प केल्याचंही त्यांनी सांगितलं. (‘Nation was shocked to witness insult of tricolour on republic day,’ says PM Modi)

 

संबंधित बातम्या:

राधाकृष्ण विखे पाटलांच्या ह्या फोटोची महाराष्ट्रभर चर्चा का?

Corona vaccine | कोरोनाला थोपवण्यासाठी सीरमची आणखी एक लस, जूनमध्ये लॉन्च होण्याची शक्यता

कोल्हापूर, औरंगाबाद, शिर्डी विमानतळाचे नामांतर होणार?; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

(‘Nation was shocked to witness insult of tricolour on republic day,’ says PM Modi)