National Cooperative Conference live : महाराष्ट्रातील 5 सहकार महर्षींना अमित शाहांचं जाहीर नमन

| Updated on: Sep 28, 2021 | 4:01 PM

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या नेतृत्त्वात देशातील पहिलं सहकार संमेलन (Cooperative conference) होत आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये (Indira Gandhi Indoor Stadium) या संमेलनाचं आयोजन करण्यता आलं आहे.

National Cooperative Conference live : महाराष्ट्रातील 5 सहकार महर्षींना अमित शाहांचं जाहीर नमन
Sahkarita Sammelan Amit Shah

नवी दिल्ली : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या नेतृत्त्वात देशातील पहिलं सहकार संमेलन (Cooperative conference) होत आहे. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये (Indira Gandhi Indoor Stadium) या संमेलनाचं आयोजन करण्यता आलं आहे. सकाळी 11 वाजता होत असलेल्या या संमेलनासाठी देशाचे पहिले सहकारमंत्री अमित शाह उपस्थित आहेत. भाजपने या संमेलनाची खास तयारी केली आहे. देश-विदेशातील कोट्यवधी लोक ऑनलाईन पद्धतीने या संमेलनात सहभागी होऊ शकतात.

या संमेलनासाठी देशभरातून सहकार क्षेत्राशी संबंधित 2 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांच्या कार्यालयानं यासंदर्भात ट्विट केलं आहे. देशातील हे पहिलंच सहकार क्षेत्रातील इतकं भव्य संमेलन आहे. या संमेलनादरम्यान अमित शाह देशाच्या सहकार क्षेत्रासाठी नेमकी कोणती घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Sep 2021 12:57 PM (IST)

    औरंगाबादेत ट्रॅव्हल्स बस पलटी, बसमध्ये तब्बल तीस प्रवासी

    औरंगाबादेत ट्रॅव्हल्स बस पलटी, बसमध्ये तब्बल तीस प्रवासी

    अजिंठा गोल टेकडी परिसरात ट्रॅव्हल्स बस झाली पलटी

    सुदैवाने कुठलिही जीवित हानी झाली नाही

    सर्व प्रवाश्यांना ट्रॅव्हल्स बसमधून काढले सुरक्षित बाहेर

    घटनास्थळी वैद्यकीय व्यवस्था आणि पोलीस यंत्रणा उपस्थित

  • 25 Sep 2021 12:42 PM (IST)

    महाराष्ट्रातील 5 सहकार महर्षींना अमित शाहांचं नमन

    सहकारी आंदोलनाला बळ देणारे माधवराव गोडबोले, विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, लक्ष्मणरावर इमानदार यांना प्रणाम करतो. यांनी सहकार क्षेत्रात मोठं योगदान दिलं.

    मी गुजरातमध्ये येतो. अमूलची निर्मिती सरदार पटेल यांच्या दूरदृष्टीतून झालं. दूध आंदोलनावेळी सरदार पटेल यांनी त्रिभुवन पटेल यांना दिलेल्या सल्ल्यातून अमूलची निर्मिती झाली. ५३ हजार कोटी रुपयांचा टर्नओव्हर झाला. सहकारामध्ये बदलाची शक्ती आहे. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना जे जमलं नाही ते अमूलने करुन दाखवलं

  • 25 Sep 2021 12:35 PM (IST)

    मोदींचे धन्यवाद, त्यांचं 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं स्वप्न सहकारातून शक्य : अमित शाह

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद, त्यांनी मला देशाचा पहिला सहकार मंत्री म्हणून निवडलं, देशातील सहकार मजबूत करणं हे आपलं ध्येय आहे, गरिबांचं कल्याण आणि शेवटपर्यंत विकास हे सहकाराशिवाय शक्य नाही. गावांना समृद्ध करणं हे सहकारामुळे शक्य आहे. सह आणि कार्य म्हणजे सहकार आहे. एकदिशेने काम केल्यास गरिबांचं कल्याण शक्य आहे. सहकारामध्ये प्रचंड ताकद आहे, सहकारातून समृद्धी हा मोदींनी नारा दिला आहे, मोदींचं ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्था गाठण्यासाठी सहकार क्षेत्र एडी-चोटीचा जोर लावेल – अमित शाह

  • 25 Sep 2021 11:12 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील घारेगावात घर कोसळून दोघांचा मृत्यू

    औरंगाबाद –

    औरंगाबाद जिल्ह्यातील घारेगावात घर कोसळून दोघांचा मृत्यू

    मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोसळले घर

    मुसळधार पावसामुळे कोसळले जुने घर

    जुनाट झालेलं घर कोसळल्यामुळे आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू

    जगदीश थोरे असं वयोवृद्ध दुर्दैवी आजोबांचे नाव

  • 25 Sep 2021 11:09 AM (IST)

    महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक, माथनी टोल नाक्यावर आंदोलन

    – महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागपुरात राष्ट्रवादी आक्रमक

    – माथनी टोल नाक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

    – राष्ट्रवादी काँग्रेस महामार्ग बंद करणार

    – मौदा- माथनी टोल नाका परिसरात रास्तारोको आंदोलन

  • 25 Sep 2021 11:09 AM (IST)

    रात्री झालेल्या मुसळधार  पावसामुळे बार्शी तालुक्यातील उक्कडगावचा संपर्क तुटला

    सोलापूर-

    रात्री झालेल्या मुसळधार  पावसामुळे बार्शी तालुक्यातील उक्कडगावचा संपर्क तुटला

    नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले

    सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान

  • 25 Sep 2021 11:08 AM (IST)

    औरंगाबादच्या बालगृहातून चार मुले गेली पळून

    औरंगाबादच्या बालगृहातून चार मुले गेली पळून..

    बाथरूमला जाण्याच नाटक करून मुले झाली पोबारा..

    अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बालगृहाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित..

    शहरभर शोधमोहीम सुरू असताना ही मुलांचा शोध लागेना..

    अनाथ ,बेपत्ता होऊन सापडलेली,विधी संघर्षातील मुले ठेवली जातात बालगृहात मात्र आता सुरक्षेचे प्रश्न निर्माण..

  • 25 Sep 2021 10:29 AM (IST)

    Cooperative Conference live : अमित शाह काय बोलणार याकडं लक्ष

    केंद्रीय सहकार मंत्री यांच्या संबोधनातून देशातील सहकाराच्या विकासाचा रोडमॅप सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींना मिळणार  का हे पाहावं लागणार आहे. सहकार क्षेत्रातील जाणकार मंडळीचं अमित शाह यांच्या संबोधनाकडे लक्ष लागलं आहे.

  • 25 Sep 2021 10:29 AM (IST)

    Cooperative Conference : सहकारी संस्थांकडून आयोजन

    इफको, नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरशेन ऑफ इंडिया, अमूल, सहकार भारती, नाफेड, कृभको आणि इतर संस्थांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष एरिअल गार्को हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. अमित शाह यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहकार मंत्रालयाचा पहिला मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात अमित शाह केंद्रीय सहकार मंत्रालयासंदर्भातील भूमिका आणि भविष्यातील वाटचाल यांसदर्भात महत्वाचं मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

  • 25 Sep 2021 10:28 AM (IST)

    केंद्रीय सहकार मंत्रालयाची जुलै महिन्यात स्थापना

    केंद्रीय सहकार मंत्रालयाची जुलै महिन्यात स्थापना करण्यात आली होती. सहकार मंत्रालयाचा कारभार अमित शाह यांच्याकडे देण्यात आला होता. सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमित शाह प्रथमच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रमात सहभागी होत मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीतील स्टेडियमध्ये 2000 प्रतिनिधी उपस्थित असतील. तर, ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगभरातील सहकार विषयाशी संबंधित व्यक्ती सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे 110 देशातील प्रतिनिधी या परिषदेला ऑनलाईन पद्धतीनं हजेरी लावणार आहेत.

Published On - Sep 25,2021 10:28 AM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.