Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालूंची मोठी घोषणा; आपल्या उत्तराधिकारी केला जाहीर, कोणी काय बोलायचं त्याचेही दिले धडे…

लालू प्रसाद यादव यांनी सांगितले की, आपला धाकटा मुलगा तेजस्वी यादव हा आपला उत्तराधिकारी असणार आहे.

लालूंची मोठी घोषणा; आपल्या उत्तराधिकारी केला जाहीर, कोणी काय बोलायचं त्याचेही दिले धडे...
Follow us
| Updated on: Oct 09, 2022 | 8:26 PM

नवी दिल्लीः देशातील राजकारणात विविध घटना घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. त्यामुळे बिहारचे राजकारणही यामध्ये आता मागे नाही. राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्याच दिवशी नेते आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी मोठी घोषणा केली. या बैठकीत बोलताना ते म्हणाले की, माझ्यानंतर माझा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Deputy CM Tejswi Yadav) हेच या पक्षाचे नेतृत्व करतील. तसेच पक्षांतर्गत जे काही निर्णय होणार असतील तेही तेजस्वी यादवच घेतील असंही त्यांनी सांगितले.

लालूंच्या या वक्तव्यानंतर पक्षाची कमान पूर्णपणे तेजस्वी यांच्या हातात आल्याचे स्पष्ट झाले असून लालूंनंतर आता पक्षाचे उत्तराधिकारीह तेच असणार आहेत.

दिल्लीत आजपासून आरजेडीचे राष्ट्रीय अधिवेशन सुरु होत आहे. हे अधिवेशन दोन दिवस चालणार असल्याचेही सांगण्यात आले.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही पार पडली आहे. त्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.

यावेळी लालू प्रसाद यादव यांनी सांगितले की, आपला धाकटा मुलगा तेजस्वी यादव हा आपला उत्तराधिकारी असणार आहे. तेच पक्षाचे काम पाहणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

त्यामुळे आता तेजस्वी यादवच कोणत्याही महत्त्वाच्या किंवा धोरणात्मक निर्णय घेतली असंही लालू प्रसाद यादव यांनी सांगितले.

आरजेडीच्या आजच्या बैठकीनंतर 10 ऑक्टोबरला तालकटोरा स्टेडियमवर राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक होणार आहे.

या बैठकीमध्ये लालू प्रसाद यादव यांना राष्ट्रीय जनता दलाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याचे त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. लालू प्रसाद यादव यांची ही 12व्या वेळी निवड होत आहे.

त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीत चर्चा झालेले ठराव परिषदेत मंजूरही केले जाणार आहेत. त्याचबरोबर या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्याची शक्यता असणार आहे.

तेजस्वी यादव यांना कार्याध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी दिला होता, मात्र जगदानंद सिंह हेच या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

लालू प्रसाद यादव यांनी आरजेडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताा म्हणाले की, मी बोलण्याआधी तेजस्वी यादवच तुम्हाला संबोधित करणार आहे.

त्यामुळे तेजस्वी यादव जे सांगतील त्याच गोष्टी तु्म्ही अंमलात आणा. आपण सगळे संघटीत राहू, आणि तिच आपल्या पक्षाची ताकद असल्याचेही त्यांनी सांगितले.

वक्तव्य करताना प्रत्येक नेत्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी सांगितले. लालू म्हणाले की, कधी कधी नेते चुकीचे विधान करतात, त्यामुळे सौम्यपण आणि भाषेत मृदूपणा ठेवण्याचा सल्लाही त्यांनी नेत्यांना दिला.

माध्यमांशी बोलतानाही तेजस्वी यादवच संवाद साधतील असंही त्यांनी यावेळी जाहीर केले.

'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.