कुडियों का है जमाना! देशात बायकांची संख्या वाढली, गड्यांची घटली, लोकसंख्येचा विस्फोट स्थिरावला?

देशात पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या वाढली आहे (NFHS-5 Sex Ratio Data). दर 1,000 पुरुषांमागे 1,020 महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1000 च्या वर पोहोचण्याचीही स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NFHS-5) मध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.

कुडियों का है जमाना! देशात बायकांची संख्या वाढली, गड्यांची घटली, लोकसंख्येचा विस्फोट स्थिरावला?
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 12:31 PM

नवी दिल्ली : एक आनंदाची बातमी आहे. देशात पहिल्यांदाच पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या वाढली आहे (NFHS-5 Sex Ratio Data). दर 1,000 पुरुषांमागे 1,020 महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1000 च्या वर पोहोचण्याचीही स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NFHS-5) मध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. यापूर्वी 2015-16 मध्ये झालेल्या NFHS-4 मध्ये, ही संख्या दर 1,000 पुरुषांमागे 991 महिला इतकी होती.

लिंग गुणोत्तरही सुधारले

एवढेच नाही तर जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तरही सुधारले आहे. 2015-16 मध्ये, 1000 मुलांमागे 919 मुली जन्माला येत होत्या. तक 2019-21 मध्ये 1000 मुलांमागे 929 मुली झाल्या आहेत.

ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तरही वाढले

NFHS-5 सर्वेक्षणाच्या अहवालानुसा लिंग गुणोत्तरातील सुधारणा शहरांपेक्षा ग्रामीण भागात चांगली झाली आहे. खेड्यांमध्ये दर 1,000 पुरुषांमागे 1,037 महिला आहेत, तर शहरांमध्ये 985 महिला आहेत. NFHS-4 मध्येही हीच बाब समोर आली होती. त्या सर्वेक्षणानुसार, खेड्यांमध्ये 1,000 पुरुषांमागे 1,009 महिला आणि शहरांमध्ये 956 महिला होत्या.

23 राज्यांमध्ये महिलांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा अधिक

देशात 23 राज्ये अशी आहेत की जिथे दर 1000 पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 1000 पेक्षा जास्त आहे. उत्तर प्रदेशात दर हजार पुरुषांमागे 1017 महिला, बिहारमध्ये 1090, दिल्लीत 913, मध्य प्रदेशात 970, राजस्थानमध्ये 1009, छत्तीसगडमध्ये 1015, महाराष्ट्रात 966, पंजाबमध्ये 938, हरियाणामध्ये 926, झारखंडमध्ये 1050 महिला आहेत.

1901 मध्ये लिंग गुणोत्तर दर हजार पुरुषांमागे 972 स्त्रिया होते. पण स्वातंत्र्यानंतर ही संख्या कमी झाली. 1951 मध्ये हा आकडा दर हजार पुरुषांमागे 946 महिलांवर कमी झाला. 1971 मध्ये ते 930 पर्यंत खाली आले. 2011 च्या जनगणनेनुसार, या आकड्यात किंचित सुधारणा झाली आणि दर हजार पुरुषांमागे महिलांची लोकसंख्या 940 वर पोहोचली.

प्रजनन दरही कमी

NFHS-5 च्या सर्वेक्षणानुसार देशातील प्रजनन दरातही घट झाली आहे. प्रजनन दर म्हणजे लोकसंख्येच्या वाढीचा दर. सर्वेक्षणानुसार देशातील प्रजनन दर 2 वर आला आहे. 2015-16 मध्ये तो 2.2 वर होता.

संबंधित बातम्या :

NEET समुपदेशन: EWS आरक्षणावर केंद्र सरकार फेरविचार करणार; सर्वोच्च न्यायालयात दर्शवली सहमती, जाणून घ्या काय झाले?

VIDEO | पंतप्रधान मोदींनी केलं नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन; कार्यक्रमात योगींची शेतकरी आंदोलनावर जोरदार टीका

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.