Assam : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आसामला, 14 जणांचा मृत्यू, आणखी 5 दिवस धोक्याचेच
महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण इथपर्यंतच निसर्गाची अवकृपा आहे. पण आसाममध्ये नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि वीज कोसळल्याने तब्बल 14 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये काही निष्पाप अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. यााबाबत आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून 'बोर्डोइसिला' ने आसामच्या अनेक भागात कहर केला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात (Unseasonable Rain) अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण इथपर्यंतच निसर्गाची अवकृपा आहे. पण (Assam) आसाममध्ये नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. वादळी वाऱ्यासह (Rain) पाऊस आणि वीज कोसळल्याने तब्बल 14 जणांचा बळी गेला आहे. यामध्ये काही निष्पाप अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. यााबाबत आसामच्या राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या म्हणण्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांपासून ‘बोर्डोइसिला’ ने आसामच्या अनेक भागात कहर केला आहे. उन्हाळ्यात येणारे वादळ आणि पाणी याला आसाममध्ये ‘बोर्डोसीला’ म्हणतात. निसर्गाच्या या लहरीपणामुळे घरांची पडझड तर झालीच आहे शिवाय विद्युत ताराही तुटल्या आहेत. असे असताना अजून 5 दिवस आसामसह इतर राज्यात वादळी वाऱ्याचा धोका हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
वादळी वारे अन् घरांची पडझड
आसाममध्ये 15 एप्रिलपासून वादळी वाऱ्याचा सामना करावा लागलत आहे. शिवाय अवकाळी पाऊसही बरसत अशल्याने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे .शुक्रवारी डिब्रुगडमध्ये झालेल्या भीषण वादळामुळे 4 लोकांचा मृत्यू झाल होता. राज्यातील विविध घटनांमध्ये 14 जाणांचा मृत्यू झाल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत शंभराहून अधिक घरांची पडझड झाली आहे तर अनेक विद्युत खांब हे उन्मळून पडले आहेत. गेल्या तीन दिवसांमध्ये आसाममध्ये किमान 7 हजारहून अधिक अस्थापनांचे नुकसान झाले आहे.
पुढील 5 दिवस धोक्याचेच
वादळी वाऱ्यामुळे न भरुन निघणारे नुकसान झाले असून हे संकट इथपर्यंतच मर्यादित नाही तर अजून 5 दिवस वादळी वाऱ्याचेच असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पाऊस किंवा विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे. IMD ने सांगितले की, पुढील पाच दिवसांत भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळ, पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार गडगडाट होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसह इतर राज्यांमध्ये उष्णतेची लाट
उत्तर भारतामध्ये निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे शिवाय अजून 5 दिवसा अशीच परस्थिती राहणार असल्याचा अंदाज आहे. 19 आणि 20 एप्रिल रोजी पश्चिम हिमालयीन भागात पाऊस किंवा विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या राज्यांमध्ये अशी परस्थिती ओढावली असताना मात्र, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, ओडिशा, झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये उन्हाच्या झळा अधिक तीव्र होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Reduction in rainfall intensity over South Peninsular India from 18th April, 2022 and Heavy rainfall spell likely to continue over Arunachal Pradesh on 17th and over Assam-Meghalaya on 17th, 19th, 20th & 21st April, 2022 pic.twitter.com/b1PqbMW6x2
— India Meteorological Department (@Indiametdept) April 17, 2022
इतर बातम्या :
Central Government : कापूस तेजीतच..झुकेगा नहीं..! आयतशुल्क माफीनंतर दरावर परिणाम काय?