AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजा इतना भी फकीर मत चुनो… दीड वर्षांनी पुन्हा त्याच वाक्याचा दाखला, सिद्धूंचा मोदींवर निशाणा

नवजोत सिंह सिद्धूंनी एप्रिल 2019 मध्ये नरेंद्र मोदींचे बड्या उद्योजकांसोबतचे फोटो शेअर केले होते

राजा इतना भी फकीर मत चुनो... दीड वर्षांनी पुन्हा त्याच वाक्याचा दाखला, सिद्धूंचा मोदींवर निशाणा
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 11:24 AM

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून मोदी सरकारवर ताशेरे ओढणं सुरुच आहे. राजा इतकाही संत (फकीर) निवडू नका, की कुठलाही व्यापारी त्याला खिशात ठेवेल, अशा शब्दात काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) अप्रत्यक्ष निशाणा साधला. विशेष म्हणजे 2019 मध्येही आचार्य चाणक्यांच्या याच वाक्याचा हवाला देत सिद्धूंनी मोदींवर थेट वार केला होता. (Navjot Singh Sidhu lashes on PM Narendra Modi over Farmer Protest)

नवजोत सिंह सिद्धू यांनी एप्रिल 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांचे अनिल अंबानी, मुकेश अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योजकांसोबतचे फोटो शेअर केले होते. तेव्हाही “राजा इतना भी फकीर मत चुनो की कोई भी व्यापारी उसे अपनी जेब में रख ले” हेच कॅप्शन सिद्धूंनी दिले होते. आता उत्तर भारतात पेटलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिद्धूंनी पुन्हा मोदींवर प्रहार केला आहे.

सिद्धूंनी एप्रिल 2019 मध्ये केलेले ट्विट

खाजगी पीक विमा कंपन्यांनी सरकारी विमा कंपन्यांची जागा घेत शेतकऱ्यांची लूट चालवली आहे, असा आरोप सिद्धूंनी दोन दिवसांपूर्वी केला होता. कृषी क्षेत्र अदानी-अंबानी गँगकडे सुपूर्द करण्यासाठी नव्या कृषी कायद्यांची रचना केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत अदानी-अंबानींची मोनोपॉली स्थापित करण्याचा हा डाव आहे, असा आरोप सिद्धू यांनी ट्विटरवरुन केला होता.

31 हजार कोटींची पीक विमा योजना होती, मात्र त्यापैकी 15 हजार कोटी शेतकऱ्यांना दिले, तर 16 हजार कोटी बिर्ला, टाटा, अंबानी यांच्या खिशात गेले. आधी केंद्र आणि राज्य सरकार नाममात्र शुल्क आकारुन एलआयसी आणि अन्य कंपन्यांना पीक विमा देत असत, मात्र नंतर खासगी कंपन्या हा क्षेत्रात उतरल्या, असा दावाही सिद्धू यांनी व्हिडीओ शेअर करत केला होता.

संबंधित बातम्या :

Farmer Protest | शेतकरी आंदोलन थांबवण्याला सर्वोच्च न्यायालयाचा नकार, ‘या’ मुद्द्यावर सर्वाधिक जोर

(Navjot Singh Sidhu lashes on PM Narendra Modi over Farmer Protest)

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.