राष्ट्रवादीच्या खासदाराची खासदारकी रद्द, गंभीर आरोपातून मुक्तता नाहीच; काय आहेत आरोप? कोण आहे खासदार?

राष्ट्रवादीत आधीच पक्ष कुणाचा या मुद्द्यावर घोळ सुरू असतानाच पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या लक्षद्वीप येथील खासदाराची खासदारकीच लोकसभा सचिवालयाने रद्द केली आहे. एका गंभीर आरोपामुळे सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीच्या खासदाराची खासदारकी रद्द, गंभीर आरोपातून मुक्तता नाहीच; काय आहेत आरोप? कोण आहे खासदार?
MP Mohammed Faizal Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 8:04 AM

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आधीच राष्ट्रवादीत धुसफूस सुरू असताना राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या एका खासदाराचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या खासदारावर एक गंभीर आरोप आहे. कोर्टाने खासदाराची शिक्षा कायम ठेवली आहे. कोणताही दिलासा मिळाला नसल्याने अखेर या खासदाराची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुले लोकसभेतील राष्ट्रवादीचं बळ एकने कमी झालं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

मोहम्मद फैजल असं या राष्ट्रवादीच्या खासदाराचं नाव आहे. या खासदारावर खुनाचा आरोप आहे. केरळ उच्च न्यायालाने त्यांच्यावरील शिक्षा कायम ठेवली आहे. त्यानंतर लोकसभेने त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 जानेवारीपासून फैजल यांची खासदारकी रद्द केल्याचं मानलं जाणार आहे. त्याच दिवशी उच्च न्यायालयाने फैजल यांना शिक्षा सुनावली होती.

‘सर्वोच्च’ दिलासा पण…

ऑगस्टमध्ये फैजल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. कोर्टाने त्यांच्या प्रकरणाची पुन्हा सुनावणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र, केरळ उच्च न्यायालयाने पुन्हा सुनावणी करताना फैजल यांची शिक्षा कायम ठेवली. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने बुधवारी त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे.

लोकसभा सचिवालयाचं बुलेटिन

लोकसभा सचिवालयाने एक बुलेटिन जारी केलं आहे. त्यात त्यांनी हा निर्णय स्पष्ट केला आहे. केरळ उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला आदेश पाहता लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पीपी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे. 11 जानेवारी 2023 रोजी उच्च न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं. त्या दिवसापासूनच फैजल यांची खासदारकी रद्द करण्यात येत आहे, असं या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.

काय आहेत आरोप?

फैजल आणि अन्य तिघांना पी. सालेह यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली 10 वर्षाच्या कठोर कारवासाची शिक्षा सुनावली होती. कावारत्ती सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर फैजल यांनी या शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली होती. त्यामुळे फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार या प्रकरणावर पुन्हा सुनावणी झाली असता कोर्टाने फैजल यांना दोषी ठरवलं आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.