NEET परीक्षेबाबत के राधाकृष्णन समितीने शिक्षण मंत्रालयाला दिला अहवाल
NEET ही वैद्यकीय अभ्यास क्रमासाठीची केंद्रीय सामायिक चाचणी परीक्षा आहे. मेडीकलच्या 1,08,000 जागांसाठी 24 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. NEET चे पेपर उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यात फुटल्याने देशभर गोंधळ उडाला होता.
काही महिन्यांपूर्वी NEET परीक्षेवरुन देशात मोठा गोंधळ झाला होता. पेपर फुटल्यामुळे कोर्टात हा विषय गेला होता. याच NEET परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार नेमलेल्या के राधाकृष्णन समितीने शिक्षण मंत्रालयाला अहवाल दिला आहे. के राधाकृष्णन यांच्या समितीने परीक्षा आयोजनाबाबत काही महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत. अनेक टप्प्यांत परीक्षा घेणे, ऑनलाइन परीक्षा घेणे आणि हायब्रीड मॉडेलचा अवलंब करणे यासारख्या अनेक मोठ्या बदलांची NEET परीक्षेबाबत समितीकडून शिफारस करण्यात आली आहे.
नीट परीक्षा घेणाऱ्या NTA मधे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची समितीकडून शिफारस करण्यात आली आहे. परीक्षा घेण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर सरकारी नियंत्रण वाढवण्याचा देखील समितीचा सल्ला आहे. NEET परीक्षेतील गोंधळानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी गंभीर दखल घेत समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले होते.
मेडीकलच्या किती जागांसाठी किती लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली?
वैद्यकीय अभ्यास क्रमासाठीची केंद्रीय सामायिक चाचणी परीक्षा असलेल्या NEET चे पेपर उत्तर प्रदेशासह देशातील अनेक राज्यात फुटल्याने देशभर गोंधळ उडाला होता. या प्रकरणात सीबीआयने अनेकांना अटक केली देखील केली होती. NEET चे पेपर फुटल्याने ही परीक्षा पुन्हा घ्यावी अशी काही जणांकडून मागणी करण्यात येत होती. पण परीक्षेच्या आयोजनात काही नियमभंग झाल्याचा कोणताही विश्वासार्ह पुरावा सापडला नाही. त्यामुळे या परीक्षा पुन्हा घेण्याची काही आवश्यकता नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मेडीकलच्या 1,08,000 जागांसाठी 24 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.