कोण आहे ती सिंगर? जिच्यावर पहलगाम हल्ल्यावरील पोस्टसाठी देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला
पहलगाम हल्ल्यानंतर एका गायिकेवर तिने केलेल्या पोस्टसाठी थेट देशद्रोहाचा आरोप करण्यात आला. तिने केलेल्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी संताप व्यक्त करत या हल्ल्याचा निषेध केला आहे.पण या हल्ल्यावरून पोस्ट करणाऱ्या एक गायिकेला मात्र चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
सोशल मीडियावर कथित ‘आक्षेपार्ह’ पोस्ट?
राजकीय गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेली भोजपुरी गायिका आणि युट्यूबर नेहा सिंग राठोड एका मोठ्या वादात अडकली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर कथित ‘आक्षेपार्ह’ पोस्ट पोस्ट केल्यानंतर नेहा सिंगविरुद्ध लखनऊच्या हजरतगंज पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊमधील गुडांबा येथील रहिवासी कवी अभय प्रताप सिंह यांनी नेहा सिंग राठोड यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केलं आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहा सिंग राठोडविरुद्ध बीएनएसच्या 11 कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहा सिंग राठोडवर लावलेले मुख्य आरोप
अभय प्रताप सिंग यांनी नेहा सिंग राठोडवर लावलेले मुख्य आरोप म्हणजे देशविरोधी विधाने करणे आणि जातीय तणाव वाढवणे. तक्रारीत विशेषतः पहलगाम दुर्घटनेबद्दलच्या त्यांच्या पोस्टमुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेहा सिंह राठोडवने मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. चौथी पोस्ट ‘पीटीआय प्रमोशन’ नावाच्या एका माजी हँडलची आहे, ज्यामध्ये नेहाचा व्हिडिओ शेअर करत असे लिहिले आहे की, ‘जेव्हा या देशभक्त भारतीय मुलीने पहलगाम हल्ल्यावर मोदीजींना आरसा दाखवला तेव्हा संपूर्ण मीडिया या मुलीला देशद्रोही म्हणू लागला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. या मुलीने योग्यच प्रश्न विचारले आहेत” असं म्हणत तिला ट्रोल करणाऱ्यांवर पलटवार करण्यात आला आहे.
मैं आज देश के गृहमंत्री पद से इस्तीफ़ा देने जा रही हूँ…शाम तक प्रधानमंत्री पद से मैं और नेहरू जी एक साथ इस्तीफ़ा देंगे.
मेरा इस्तीफ़ा इसलिए ज़रूरी है क्योंकि मैं देश को आतंकी हमलों से नहीं बचा पाई…
मणिपुर नहीं जा पायी…
रेल दुर्घटनाएँ नहीं रोक पाई… pic.twitter.com/q3aU7k1awM
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) April 28, 2025
पहलगाम हल्ल्यांबद्दल नेहाची मोदींवर टीका
पहलगाम हल्ल्यांबद्दल नेहाने एका व्हिडीओ असं म्हटलं की, “मी सरकारला कोणते प्रश्न विचारावेत? शिक्षण आणि आरोग्याचे प्रश्न आता प्रासंगिक राहिलेले नाहीत. राष्ट्रवादाचे राजकारण असूनही, लोक मारले जात आहेत आणि हिंदू-मुस्लिम तणाव शिगेला पोहोचला आहे.” असं म्हणत तिने पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली भाजप सरकार मते गोळा करत असल्याचा आरोपही तिने केला होता. येत्या बिहार निवडणुकीदरम्यान पहलगाम हल्ल्याच्याबाबतीतही असंच घडेल, असंही ती स्पष्ट म्हणाली. 26 एप्रिल रोजी तिने पुन्हा पोस्ट करत म्हटले की, “मी हे पुन्हा पुन्हा सांगेन की जर बिहारच्या निवडणुका पहलगामच्या मुद्द्यावर लढल्या गेल्या तर बिहारचे स्वतःचे मुद्दे बाजूला पडतील.”
पूरी भाजपा के नेताओं के जितने बच्चे फ़ौज में होंगे…उससे ज़्यादा तो मेरे अपने परिवार के लोग सेना में अपनी जान दाँव पर लगा चुके हैं…
…लेकिन आज भाजपा का आईटी सेल मुझे देशद्रोही कह रहा है क्योंकि मैं बिना डरे सवाल पूछती हूँ.
प्रधानमंत्री से सवाल पूछना देशद्रोह है क्या?… pic.twitter.com/t6ImAbbZpX
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) April 27, 2025
“भाजप हा देश नाही….”
पुढे ती म्हणाली की, सरकारला प्रश्न विचारता आले पाहिजे. नेहा सिंग राठोडचा असा विश्वास आहे की लोककलाकाराने लोकांच्या बाजूने राहून सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. हा त्याचा धर्म आहे. तिने म्हटलं,”मी माझ्या धर्मासोबत आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मला विरोध करणे म्हणजे याला राजकारण म्हणतात का? जर हे राजकारण असेल तर मग हुकूमशाही म्हणजे काय? भाजप हा देश नाही… आणि पंतप्रधान हा देव नाही. लोकशाहीमध्ये टीका होईल आणि प्रश्नही विचारले जातील.” असं म्हणत तिने भाजप आणि सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.