Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, कोरोनाबळींचे आकडे 400 ने वाढले

| Updated on: Jun 02, 2021 | 9:57 AM

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 83 लाख 7 हजार 832 वर गेला आहे. (New 132788 Corona Cases in India)

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये अल्प वाढ, कोरोनाबळींचे आकडे 400 ने वाढले
Corona
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत 5 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 32 हजार 788 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 3 हजार 207 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत अल्प वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 132788 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 1 लाख 32 हजार 788 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 207 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 2 लाख 31 हजार 456 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 83 लाख 7 हजार 832 वर गेला आहे. देशात 2 कोटी 61 लाख 79 हजार 85 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 35 हजार 102 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 17 लाख 93 हजार 645 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 1,32,788

देशात 24 तासात डिस्चार्ज –2,31,456

देशात 24 तासात मृत्यू –3,207

एकूण रूग्ण –  2,83,07,832

एकूण डिस्चार्ज – 2,61,79,085

एकूण मृत्यू – 3,35,102

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 17,93,645

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 21,85,46,667 (New 132788 Corona Cases in India)

संबंधित बातम्या :

कोरोना काळात पुदिन्याच्या चटणीचा आहारात करा समावेश; इम्युनिटी वाढवण्याबरोबरच मिळतील बरेच लाभ

‘ऑगस्टपासून दररोज 1 कोटी लोकांचं लसीकरण होणार, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार’, ICMR चा दावा

(New 132788 Corona Cases in India in the last 24 hours)